शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:10 IST

सिन्नर: साडेपाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेस लग्नात मानमान दिला नाही आणि गर्भपात करावा, यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुक्यातील बारागावपिंप्री येथील सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघा संशयिताना अटक करण्यात आली असून, सिन्नर न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देबारागावपिंप्री : तिघा संशयितांना अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

सिन्नर: साडेपाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेस लग्नात मानमान दिला नाही आणि गर्भपात करावा, यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुक्यातील बारागावपिंप्री येथील सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघा संशयिताना अटक करण्यात आली असून, सिन्नर न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.ऊर्मिला रोशन वाणी (२०, रा. बारागावपिंप्री) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सोमवारी दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. त्यानंतर तिची आई कल्पना दत्ता पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन सासरच्या पाच जणांविरोधात मुलीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सासरच्या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ऊर्मिला हिचा २५ जून रोजी नाशिकरोड येथे रोशन वाणी याच्यासोबत विवाह झाला होता. काही दिवसांनी ऊर्मिला माहेरी आल्यानंतर तिने सासू लताबाई व जाव कोमल या टोमणे मारून वाईटसाईट बोलत असल्याने माहेरी सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तुझ्या आईवडिलांनी लग्नात आम्हाला मानपान दिला नाही, त्यामुळ आमचे नातेवाईक नावे ठेवतात असे वाईटसाईट बोलत असल्याचे सांगितले होते. त्यांनतर माहेरच्यांनी तिला समजून सांगितले. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी ऊर्मिला हिचा माहेरी फोन आला तेव्हा तीने गर्भवती असल्याचे सांगितले. तू गर्भवती राहिल्यास घरातील व शेताची कामे कोण करेल, असे बोलून सासू, सासरे, जाव आणि भाया यांनी गर्भपात करावा, यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीहून सासू लता केरु वाणी, सासरे केरू पांडुरंग वाणी, पती रोशन केरू वाणी, जाव कोमल संदीप वाणी आणि भाया संदीप केरू वाणी या पाच संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती, सासरे व भाया या तिघांना अटक करण्यात येऊन सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के अधिक तपास करीत आहेत. (०९ उमिर्ला वाणी)

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी