शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बाजार समितीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:31 AM

वणी : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी यांना धमकावून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी सतीश दिलीप जाधव याच्यावर वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवणी : वैद्यकीय अधिकाºयास धमकावणे पडले महागात स्थानिक गुन्हा शाखेने जाधव या चे विरोधात कारवाई करून बंधपत्रही करून घेतले होते

वणी : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी यांना धमकावून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी सतीश दिलीप जाधव याच्यावर वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, वणी ग्रामीण रुग्णालयात कोमल देवीदास चौरे या वैद्यकीय अधिकारी गेल्या दहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. १४ एप्रिल रोजी सकाळपासून डॉ. चौरे कर्तव्य बजावत होत्या. दुपारी १ वाजून १५ मिनिटाचे सुमारास शवविच्छेदन करून आल्या असता पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी सतीश दिलीप जाधव हा ग्रामीण रु ग्णालयात आला व माझा फोन का उचलला नाही, असे विचारून धमकी देऊ लागला. शवविच्छेदन करत असल्याने व फोन सायंलेट होता म्हणून उचलला नाही, असे चौरे यांनी सांगितले तेव्हा जुना घटनाक्रम आठवण करून देईन, ग्रामसभेत केलेला ठराव विसरल्या असणार, ग्रामपंचायतमधे ठराव करून नागपूरला बदली करून टाकेल, असा दम दिला. तसेच सहा ते सात वेळा ग्रामीण रु ग्णालय येथे येऊन धमकी दिली, अशी तक्र ार डॉ. चौरे यांनी दिली आहे.दरम्यान, डॉक्टर चौरे यांना काही घटकांनी तक्रार मागे घेण्यास दबावतंत्राचा वापर केला. मात्र त्याला न जुमानता वारंवार होणाºया जाचाला कंटाळून डॉ. चौरे यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. भादंवि कलम ३५३ व ५०६ अन्वये सतीश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जाधवविरोधात कारवाईसतीष दिलीप जाधव याचेवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तसेच जिल्हा न्यायालयात अब्रुनुकसानीचे दोन दावे दाखल असुन स्थानिक गुन्हा शाखेने जाधव या चे विरोधात कारवाई करून बंधपत्रही करून घेतले होते