शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये क्रिकेट फिव्हर! तरुणाईकडून रॅली, मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामन्याचे प्रक्षेपण

By संजय पाठक | Updated: November 19, 2023 14:29 IST

रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यातच विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार असल्याने नाशिक मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नाशिक- विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी तमाम  भारतवासीय सज्ज झाले असून नाशिक मध्ये ही क्रिकेट फुव्हर चढला आहे. नाशिक शहराच्या विविध भागात आज तरुणांनी तिरंगा ध्वज घेऊन बाईक तसेच मोटार सायकल रॅली काढल्या आणि भारताचा जयघोष करतानाच भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यातच विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार असल्याने नाशिक मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कॉलेज रोडवरील बिग बाजार येथे एका नाशिक युथ फौंडेशनच्यावतीने मल्टिप्लेक्सच्या मोठ्या पडद्यावर विनामूल्य अंतिम सामन्याचे प्रक्षेपण आयोजित केले आहे दुपारी दीड वाजेपासून हे प्रक्षेपण सुरू होणार आहे. याशिवाय पंचवटी भागातील  पाथरवट लेन येथेही एका गजानन मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या पडद्यावर मॅच दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नाशिक शहरातील विविध सोसायट्यांमध्ये गेट-टुगेदर आणि मॅच प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय शहरातील गार्डन रेस्टॉरंटच्या ठिकाणीही मोठ्या पडद्यांवर क्रिकेटचे सामने दाखवण्यात येणार आहेत. काही हॉटेल्सने सामन्यामुळे बिलामध्ये सवलत देण्याची ही घोषणा केली आहे. नाशिक मधील एक क्रिकेट प्रेमी अवलिया सचिन गीते यांनी पाच तोळे सोन्याचं विश्व चषकाच्या आकाराचं लॉकेट देखील तयार करून घेतलं आहे. अंतिम सामना सुरू होईल तसा क्रिकेटचा फीवर वाढणार आहे. भारताच्या कामगिरीवर पुढील मूड राहणार आहे असे दिसते.

टॅग्स :NashikनाशिकICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कप