शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळखोरीमुळे पतसंस्था बुडतात

By admin | Updated: September 26, 2016 01:53 IST

थोरात : जिल्हा टीचर्स पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन

नाशिक : महाराष्ट्राची प्रगती व समृद्धीमध्ये सहकारक्षेत्राचा मोठा वाटा असून, ही चळवळदेखील महाराष्ट्रातूनच सुरू झाली़ सहकार क्षेत्राचा पाया हा कार्यकर्ता असून, त्यांच्यामुळेच या क्षेत्राने चळवळीचा रूप घेतले व यशस्वीही झाली़ मात्र, या क्षेत्रातही आर्थिक दिवाळखोरीने शिरकाव केल्याने राज्यभरातील बहुतांश नामांकित पतसंस्था बुडाल्या आहेत़ अशा विदारक परिस्थितीत रौप्यमहोत्सव साजरा करणारी पतसंस्था असेल तर तिच्या कारभार व कारभाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले़ हनुमानवाडीतील भावबंधन मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात थोरात बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रासाठी सध्याची परिस्थिती ही आव्हानात्मक बनली आहे़ राज्यातील बहुतांशी नामांकित पतसंस्था या आर्थिक दिवाळखोरीत निघत असताना या संस्थेने रौप्यमहोत्सव साजरा करणे ही खरोखर अभिमानाची बाब आहे़ विद्यार्थी व संस्था यांच्या भवितव्यासाठी एकत्रितपणे चर्चा केली पाहिजे़शिक्षणक्षेत्रातील समस्या या मोठ्या असून, त्यांच्यासमोर रिक्त जागांचा प्रश्न आहे़ या समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही थोरात यांनी सांगितले़ पतसंस्थेचे अध्यक्ष दौलत शिंदे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीबाबत माहिती दिली़ यावेळी आमदार देवयानी फरांदे, प्राचार्य विष्णू रसाळ, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अ‍ॅड़ नितीन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष व माजी खासदार प्रतापदादा सोनवणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते़ मान्यवरांच्या हस्ते पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर डॉ. सुनील ढिकले, नाना महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष माणिकराव वानगे, अशोक बाजारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)