शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाची वर्गवारी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:50 IST

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे.

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत शेतकºयांच्या खात्यात दुसºया टप्प्यातील अनुदान जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सुधारित मागणीनुसार जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आता केवळ २० लाखांचे अनुदान शिल्लक राहणार असून, तेही लवकरच प्राप्त होणार आहे.आॅक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाले तर साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर प्रशासनाने शासनाला ५७३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु नुकसानीची तीव्रता मोठी असल्याने ५९७ कोटींच्या  सुधारित अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वीच अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील १८१ कोटी ५० लाखांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले होते.शेतीसाठी आठ हजार प्रती हेक्टरी तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत निधीचे वाटप करण्यात आले. सुमारे अडीच लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली.दुसºया टप्प्यातील सुमारे ३९६ कोटी ६२ लाखांचे अनुदान प्राप्त झाल्याने उर्वरित शेतकºयांना अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी काहीसा विलंब झाला होता. परंतु आता बाधित शेतकरी आणि पिकांची माहिती हाती असल्याने दुसºया टप्प्यातील अनुदान वाटप सुलभ होणार आहे. त्यामुळे दुसºया टप्प्यातील अनुदान लवकरच शेतकºयांच्या हाती पडणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्या स्वाक्षरीनंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.केवळ २० लाखांचे अनुदान शिल्लकजिल्ह्यातील नुकसानभरपाईसाठी पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील अनुदान प्राप्त झाल्यानंतर सुधारित मागणी केल्यानुसार आता केवळ १९७८ लाखांचे अनुदान प्राप्त होणे बाकी आहे. दुसºया टप्प्यातील अनुदानाचे वाटप झाल्यानंतर उर्वरित अनुदानही लवकरच जिल्ह्याला प्राप्त होऊन त्याचेही वाटप शेतकºयांना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १८१ आणि दुसºया टप्प्यात ३९६ कोटींचे अनुदान जिल्ह्यातील शेतकºयांसाठी प्राप्त झाल्याने जिल्ह्याला पुरेपूर अनुदान प्राप्त झाले आहे.तालुकानिहाय मदतनिधी (लाखात)मालेगाव ७०२९.६३बागलाण ४२७४.३७नांदगाव ३०१८.७७कळवण १६१२.०३दिंडोरी २३६४.५१देवळा १८९०.०२सुरगाणा १३५१.०६नाशिक १००९.३६इगतपुरी ८७७.४९पेठ ७८९.८३त्र्यंबकेश्वर ४४२.६०निफाड ४८६०.०४चांदवड ३३५३.७३येवला ३३०५.५३सिन्नर ३४८३.४५एकूण ३९६६२.४५

 

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी