शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग कारागीर व्यस्त : संक्रांतीला वाण देण्यासाठी महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:32 IST

चांदोरी : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

चांदोरी : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.निफाड तालुक्यातील कुंभार समाज जुन्या पद्धतीनेच चाकाचा वापर करून सुगडे(बोळके) तयार करत आहे. मागील महिन्याभरापासून चांदोरी सह परिसरातील पिंपळस, चाटोरी, चितेगाव, सायखेडा व गोदाकाठ परिसरात व तालुक्यातील इतर गावांमध्ये सध्या कुंभार समाज बांधव सुगडे बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीच्या दिवशी महिलांना वाण देण्यासाठी सुगड्यांचे विशेष धार्मिक महत्त्व आहे.बाजारात अनेक रेडीमेड प्लास्टीकचे सुगडे विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. मात्र, धार्मिकदृष्ट्या मातीच्या सुगड्यांचेच महत्त्व आहे. त्यामुळे महिला या सुगड्यांनाच पसंती देत असतात. सध्या निफाड तालुक्यातील सर्वच कुंभार समाज बांधव सुगडे घडविणे, वाळविणे व भाजने आदी कामांमध्ये मग्न आहे.आजच्या आधुनिक युगात बारा बलुतेदरीच्या अनेक व्यावसायिकांना घरघर लागली आहे. मात्र, उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्यासाठी लागणारा माठ, रांजण त्यास पर्याय नाही. त्यामुळे आजच्या युगातही आमचा पारंपरिक व्यवसाय तग धरून आहे.- तुषार गारे, युवक सचिव, महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था

टॅग्स :Nashikनाशिक