शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वासराला वाचविताना गाईने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:57 IST

बिबट्याचा हल्ला : बोपेगाव येथे घडली घटना

ठळक मुद्देबिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

दिंडोरी : ‘आईचे काळीज, तुटते लेकरा, गाय रे वासरा, हंबरते...’या अभंगात माय-लेकराचे नाते उधृत केलेले आहे. मनुष्य असो प्राणी, आई या शब्दाला हळवेपणाची, संवेदनशीलतेचीही किनार आहे. मुक्या प्राण्यालाही भावना असतात आणि आपल्या बाळाप्रती त्यांच्याही संवेदना असतात. त्याचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे आला आहे. वसंत कावळे यांच्या गोठ्यात दोन दिवसांच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढविला तेव्हा आक्रमक होत गाईने बिबट्याचा हल्ला परतावून लावला परंतु, या संघर्षात वासराचे प्राण वाचविताना गाईला आपला जीव गमवावा लागला.बोपेगाव येथील शेतकरी वसंत रु ंजाजी कावळे यांचे गोठ्यात दोन दिवसांपूर्वीच जन्माला आलेल्या वासरासोबत गाय बांधण्यात आलेली होती. गुरु वारी पहाटे (दि.२७) बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या गाईने हा हल्ला परतवून लावला. या संघर्षात बिबट्याने गाईवर मागून हल्ला चढवत तिला जबर जखमी केले. त्यात गाईला आपले प्राण गमवावे लागले मात्र तिने आपल्या वासराचे संरक्षण केले . सकाळी जेव्हा ही घटना लक्षात आली त्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आईची मान चाटत वासरू हंबरताना दिसून आले. हे करुण दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्यांना गहिवरून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे .दरम्यान, बोपेगाव परिसरात बिबटयाने धुमाकूळ घातला असून वन विभागाने बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

टॅग्स :Nashikनाशिक