अंदरसुल : येवला तालुक्यातील बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने मंगळवारी (दि २०) जि. प. प्रा. शाळेत पंचक्रोशीतील तिन्ही गावातील ४५ वयोगटापुढील ग्रामस्थांचे कोविड लसीकरण आणि कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.बोकटेचे सरपंच प्रताप दाभाडे, दुगलगाव येथील सरपंच रावसाहेब लासुरे, देवळाने येथील सरपंच सागर गोसावी यांनी अंदरसुल येथील आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी महेंद्र काले, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीन निरीक्षक रजपूत, पोलिस हवालदार पिसाळ, मोरे, पारधी, आरोग्य आधिकारी अंदरसुल डॉ. तारुर, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, ग्रामसेवक भावराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे आदी उपस्थित होते.
बोकटे परिसरात कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:36 IST
अंदरसुल : येवला तालुक्यातील बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने मंगळवारी (दि २०) जि. प. प्रा. शाळेत पंचक्रोशीतील तिन्ही गावातील ४५ वयोगटापुढील ग्रामस्थांचे कोविड लसीकरण आणि कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
बोकटे परिसरात कोविड लसीकरण
ठळक मुद्देग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन