नाशिक : जिल्हा न्यायालयाशेजारील पोलिसांच्या जागेसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत दि. २९ सप्टेंबरपर्यंत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला दिल्याची माहिती अॅडव्होकेट काका घुगे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली आहे़सद्यस्थितीत जिल्हा न्यायालयातील जागा कोर्ट, पक्षकार व वकील वर्गास अपुरी पडते आहे़ त्यामुळे न्यायालयाच्या पश्चिम बाजूकडील पोलिसांची जागा मिळावी यासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅडक़ाक़ा़ घुगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात १३७/२०१३ जनहित याचिका दाखल केली आहे़ यावर न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले असून न्यायामूर्ती ए़एस़ ओक व के.आऱ श्रीराम यांनी यावर योग्य मार्ग काढण्याचे गरजेचे आहे असे नमूद करून केले आहे़जिल्हा न्यायालयात सध्या असलेली जादा जागेची गरज व भविष्यात लागणाऱ्या जागेची गरज यांचा सविस्तर अहवाल २९ सप्टेंबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालय व्यवस्थापन समितीला पाठविण्याचे आदेश दिले आहेत़ या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालय निर्णय घेणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे़
न्यायालयालगतची जागा; अहवाल पाठविण्याचे आदेश
By admin | Updated: September 23, 2015 23:57 IST