शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रबाजार समितीला न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:30 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी उच्च न्यायालयात सहकार खात्याने पाठविलेल्या नोटिसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होऊन संचालक मंडळाला आणखी एक महिन्याचा दिलासा मिळाला. बाजार समिती बरखास्त झाल्यानंतर संचालक मंडळाला न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रशासकांनी पुरेसा वेळ द्यावा, ही प्रमुख मागणी न्यायालयाने मान्य करून एकप्रकारे बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती दिली.

ठळक मुद्दे गेल्या आठवड्यात सहकार आयुक्तांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तअनिल चव्हाण यांची प्रशासक म्हणून नेमणूकसंचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

बरखास्तीला स्थगिती : संचालकच कामकाज पाहणा

 

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी उच्च न्यायालयात सहकार खात्याने पाठविलेल्या नोटिसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होऊन संचालक मंडळाला आणखी एक महिन्याचा दिलासा मिळाला. बाजार समिती बरखास्त झाल्यानंतर संचालक मंडळाला न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रशासकांनी पुरेसा वेळ द्यावा, ही प्रमुख मागणी न्यायालयाने मान्य करून एकप्रकारे बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती दिली.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूणच कारभाराच्या विरोधात सहकार खात्याने चालविलेल्या चौकशीच्या आधारे गेल्या आठवड्यात सहकार आयुक्तांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर अनिल चव्हाण यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. बाजार समितीच्या सन १९९५ पासूनच्या कारभारात महाराष्टÑ राज्य कृषी पणन महामंडळाचे थकीत कर्ज, राज्य सहकारी बॅँकेचे थकीत कर्ज, कर्मचाºयांचे भविष्य निर्वाह निधी, निलंबित कर्मचाºयांचा वकील फी खर्च, जाहिरातबाजीवर केलेला अनावश्यक खर्च, रोजंदारी कर्मचाºयांची अनावश्यक भरती यांसह दहा मुद्द्यांवर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या विद्यमान संचालकांना कलम ४५ नुसार नोटीस बजावली होती. या नोटिसीच्या विरोधात गेल्या वर्षीच संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती व विद्यमान संचालक मंडळाच्या कारकिर्दीत उपरोक्त घटना घडलेल्या नसून, पूर्वीच्या संचालकांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयासाठी विद्यमान संचालकांना दोषी धरणे चुकीचे व अन्यायकारक असल्याची बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने संचालकांचे म्हणणे विचारात घेऊन बाजार समिती बरखास्त झाल्यास प्रशासकांनी पंधरा दिवसांनंतर पदभार घ्यावा, तोपर्यंत संचालक मंडळाला कारवाईच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येईल, असे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात बाजार समिती बरखास्त झाल्यानंतर संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली असता, मंगळवारी त्यावर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने आपल्या पूर्वीच्या निर्णयाला १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक नेमूनही आता प्रशासकाला पदभार स्वीकारता येणार नाही, त्याचप्रमाणे बाजार समितीचे संचालक पूर्वीप्रमाणे बाजार समितीच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात.