शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी पुन्हा न्यायालयाकडेच दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:15 IST

महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील पाचशेहून अधिक धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत. नाशिक शहराची ओळख मंदिरांचे शहर असून, शहराची ओळख पुसण्याचे काम प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी सर्व धर्मियांच्या संघटना सज्ज असून, धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मठ, मंदिर बचाव समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले.

ठळक मुद्देमठ, मंदिर बचाव समिती : सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन

पंचवटी : महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील पाचशेहून अधिक धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत. नाशिक शहराची ओळख मंदिरांचे शहर असून, शहराची ओळख पुसण्याचे काम प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी सर्व धर्मियांच्या संघटना सज्ज असून, धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मठ, मंदिर बचाव समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले.मठ, मंदिर बचाव समितीची बैठक गुरु वारी (दि.११) सायंकाळी पटांगणावर साधू-महंत, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच धार्मिक संघटनांच्या उपस्थितीत संपन्न झाली. प्रशासनाने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावून पंधरवड्यात बांधकाम न हटविल्यास प्रशासन ते बांधकाम हटविणार असल्याचे स्पष्ट केल्याने धार्मिक स्थळे बचाव करण्यासाठी मठ, मंदिर बचाव समितीने पुढाकार घेतला आहे. प्रशासनाने अनेक धार्मिक स्थळे बेकायदा ठरवून नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केवळ टेबलवर बसून सर्वेक्षण केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.मनपात लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतर सर्वेक्षण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बेकायदा धार्मिक स्थळे ठरविताना पोलीस प्रशासनालाही विचारलेले नाही. जर मंदिरे अनधिकृत असतील तर मंदिरासमोर आमदार खासदार निधीतून उभारलेली समाज मंदिरे अधिकृत कशी काय, असा सवाल यावेळी करण्यात आला.धार्मिक स्थळे बचावण्यासाठी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून सर्वपक्षीयांनी तसेच सर्व धर्मीयांच्या संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देत चुकीच्या कारभाराला शह देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असा सूर बैठकीत निघाला. बैठकीला माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते गजानन शेलार, भाजपाचे दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, वत्सला खैरे, वैशाली भोसले, महंत भक्तिचरणदास, डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, रामसिंग बावरी, मुक्तार शेख, विनोद थोरात, कैलास देशमुख, दिगंबर धुमाळ, संतोष इसे उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच नोटिसागेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौºयावर आले होते. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच मंदिरांना रात्रीच्या वेळी नोटिसा लावण्याचे काम केले. मंदिरे धार्मिक स्थळे अनधिकृत नाही ही शक्तिस्थळे, भक्तिस्थळे असून न्यायालयाला पटवून दिले पाहिजे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेCourtन्यायालय