शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कार दरीत कोसळून दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 15:03 IST

सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली.

सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली.मुल्हेर येथील व्यापारी रामजीवन मुरलीधर शर्मा (४८), पत्नी पुष्पा शर्मा (४३) हे बुधवारी रात्रीच्या सुमारास साल्हेर किल्ल्यानजिक असलेल्या हॉटेलवर जेवणासाठी गेले होते .रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास जेवण आटोपून आपल्या तवेरा कारने मुल्हेरकडे परतीच्या मार्गावर असतांना हॉटेलनजीकच त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट पंधराशे फुट दरीत कोसळली .गुजरातमधील डांग जिल्ह्यातील चिंचलीच्या घनदाट जंगलात कारसह दोघे अडकले .घटनेचे वृत्त कळताच मुल्हेर येथील व्यापारी वर्ग तसेच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात शोध कार्य सुरु केले .यावेळी शर्मा दाम्पत्याचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले.घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली .ही दुर्घटना गुजरातच्या जंगलात घडल्यामुळे तत्काळ गुजरातच्या पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली .आज सकाळी गुजरात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाहणी करण्यात आली .वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाº्यांच्या मदतीने दुपारी उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरु होते . याप्रकरणी अहवा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

टॅग्स :Nashikनाशिक