शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कार दरीत कोसळून दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 15:07 IST

सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली.

सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली.मुल्हेर येथील व्यापारी रामजीवन मुरलीधर शर्मा (४८), पत्नी पुष्पा शर्मा (४३) हे बुधवारी रात्रीच्या सुमारास साल्हेर किल्ल्यानजिक असलेल्या हॉटेलवर जेवणासाठी गेले होते .रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास जेवण आटोपून आपल्या तवेरा कारने मुल्हेरकडे परतीच्या मार्गावर असतांना हॉटेलनजीकच त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट पंधराशे फुट दरीत कोसळली .गुजरातमधील डांग जिल्ह्यातील चिंचलीच्या घनदाट जंगलात कारसह दोघे अडकले .घटनेचे वृत्त कळताच मुल्हेर येथील व्यापारी वर्ग तसेच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात शोध कार्य सुरु केले .यावेळी शर्मा दाम्पत्याचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले.घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली .ही दुर्घटना गुजरातच्या जंगलात घडल्यामुळे तत्काळ गुजरातच्या पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली .आज सकाळी गुजरात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाहणी करण्यात आली .वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाº्यांच्या मदतीने दुपारी उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरु होते . याप्रकरणी अहवा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .--------------------------हॉटेल नव्हे मृत्यूचा सापळा .........गेल्या चार वर्षांपासून साल्हेर किल्ल्यालगत असलेल्या गुजरात सीमेवरील डोंगरावर अनिधकृत हॉटेल राजरोस सुरु आहे .गेल्या वर्षी सटाणा येथील युवक देखील दरीत कोसळला होता.मात्र सुदैवाने झाडांमध्ये अडकल्याने तो बचावला .याबाबत पोलीस आणि वन विभागकडे देखील तक्र ारी करण्यात आल्या होत्या. ग्राहकांसाठी ते हॉटेल मृत्यूचा सापळा ठरले आहे.पोलिसांनी अपघात प्रकरणी हॉटेल चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक