शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ये देश है वीर जवानों का...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:22 IST

शहरातील विविध शाळांमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़ विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला़

नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़ विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला़वडनेर गेट येथे साई अनिरुद्ध समर्थ संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त माजी लष्करी अधिकारी व सैनिकांचा सत्कार करून आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक डॉ. युवराज मुठाळ, डॉ. संजय गुप्ता, नगरसेवक केशव पोरजे, ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम कोठुळे, विक्रम कोठुळे, संजय पोरजे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील कोथमिरे, सुनील पोरजे, राजू पोरजे, संपत बुटे, अर्जुन पोरजे, हिरामण माळी, पांडुरंग पोरजे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या लष्करी अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी कॅप्टन कमल सिंग, कॅप्टन ए.पी. राठोड, कॅप्टन रामदास शिरोडे, कॅप्टन यशवंत हुन्नरे, कॅप्टन सुकदेव गवळी, सुभेदार मेजर जेपीएन पाठक, सुभेदार राजेंद्र जाधव, सुभेदार राम यादव, सुभेदार भरत सिंग, सुभेदार जितेंद्र सिंग, विलास निकम, तानाजी सानप यांच्यासह ७० माजी लष्करी अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला. तसेच वीर पत्नी गितादेवी ब्रिजबिहारी तिवारी यांना साडीचोळी देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी लष्करी अधिकारी व जवानांची डॉ. विलासराव वाघ, मनदिप सिंग, भिमा कर्डीले, संपत कर्डीले, सुभाष पगारे, महेंद्र पोरजे, परिचारीका नायर, देशपांडे आदिंनी आरोग्य तपासणी केली. यावेळी आजारानुसार संबंधितास एक महिन्याची औषधे मोफत देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज मुठाळ व आभार विक्रम कोठुळे यांनी मानले.शहिदांना आदरांजलीकारगिल विजय दिनाचे औचित्य साधून आरंभ महाविद्यालयातील भारतीय सैन्याची शौर्यगाथा दाखविणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट दाखविण्यात आला. शाळा समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक परिवारातील राजेश पंडित यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य दिलीप वाणी यांनी कारगिल युद्धाबाबत माहिती दिली. यावेळी शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपप्राचार्य सुनील हिंगणे, नीलेश चव्हाण, बाळासाहेब काळे, प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. राजेश खताळे, प्रा. संदीप गांगुर्डे आदी उपस्थित होते़

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNashikनाशिक