इगतपुरी : तालुक्यातील 5 सार्वित्रक आण ि 1 ग्रामपंचायतींच्या घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी तहसील कार्यालयात करण्यात आली.निकाल ऐकन्यासाठी ग्रामस्थानी तहसील आवारात गर्दी केली होती. तहसीलदार महेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनखाली मतमोजणी प्रक्रि या पार पडली.दरम्यान , कर्होळे ग्रामपंचायतीच्या सर्व7 जागांवर माजी सरपंच पांडुरंग खातळे यांच्या पॅनेलने विजय मिळवला. यापूर्वी आशाबाई पांडुरंग खातळे, लताबाई अशोक आघाण ह्या दोघी बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर आज झालेल्या मतमोजणीमध्ये मंदाबाई निवृत्ती लाव्हरे, निवृत्ती गोपाळा लाव्हरे, संगीता लक्ष्मण खातळे, गंगाराम भाऊराव भगत हे निवडून आले. विरोधी पॅनलच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी नितीन बाहिकर यांनी काम पाहिले. निवडून आलेल्या उमेदवारांचा संतु पाटील खातळे,लक्ष्मण खातळे, शिवाजी खातळे, भारत खातळे, गोविंद खातळे,तुकाराम खातळे, शमशोद्दीन शेख, रामा उघडे, रामचंद्र आघाण, पांडुरंग आघाण, देवराम आघाण , राजाराम खातळे,दिनकर खातळे यांच्यासह ग्रामस्थांनी जल्लोषात अभिनंदन केले आहे.कर्होळे ग्रामस्थांनी केलेल्या अमूल्य सहकार्यामुळे गावातील सर्व जागा ताब्यात घेता आल्या. विरोधकांसह सर्वांना सोबत घेऊन गाव विकिसत करणार आहोत- पांडुरंग खातळे, माजी सरपंच तथा पॅनलचे नेते़ (वार्ताहर)
इगतपुरी तालुक्यात मतमोजणी शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 22:36 IST