शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केळझर पाणीपुरवठा योजना रद्द करण्यास नगरसेवकांचा नकार

By admin | Updated: September 5, 2015 23:40 IST

सटाणा नपाच्या ठरावाविरुद्ध अपील : योजना पूर्ण करण्यासाठी साकडे

नाशिक : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली व सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत सटाणा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यात यावा, यासाठी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अपील दाखल केले आहे. नगरपालिकेच्या १९ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करून त्याऐवजी नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करून त्यास मंजुरी द्यावी, असा ठराव मंजूर केला आहे. त्यास विरोध करून शुक्रवारी बारा नगरसेवकांनी जिल्हा-धिकाऱ्यांची भेट घेऊन नगरपालिकेच्या ठरावावर अपील दाखल केले. त्यात म्हटले आहे की, १९९८ साली युती सरकारच्या कार्यकाळात केळझर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरांतर्गत वितरण व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झालेला असून, लवकरच सटाणा शहरापर्यंत पाणी पोहोचेल, अशी परिस्थिती आहे. धरणालगत असलेल्या काही गावांनी या योजनेस विरोध केला असता मुंबई उच्च न्यायालयानेदेखील पोलीस बंदोबस्तात योजनेची कामे करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्याने सटाणा नगरपालिकेला पत्र देऊन केळझर पाणीपुरवठा योजनेऐवजी कळवण तालुक्यातील नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करावी, असे सुचविले. मुळात नवीन पूनद प्रकल्पातून नवीन योजना करण्यासाठी धरणाच्या पाण्यावर आरक्षण टाकण्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याचबरोबर नवीन योजनेसाठी लागणारा खर्च कोण करेल, त्याचबरोबर केळझर योजनेसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच दृष्टीपथात असलेले पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्यासाठी करण्यात आलेला ठराव रद्द करण्यात येऊन ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणीही या अपिलात करण्यात आली आहे. या अपिलावर बाळासाहेब सोनवणे, साहेबराव सोनवणे, नलिनी सोनवणे, मनोज सोनवणे, सुशीला रौंदळ, सिंधूबाई सोनवणे, मंदाकिनी सोनवणे, सुमनबाई सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, अनिल कुवर, अश्पाक शेख, रमणलाल छाजेड आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)