शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर ३३१ रुपये जुडी; उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:13 IST

गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीर शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दिवसेंदिवस दर वाढत चालले असून, मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाला ३३ हजार १०० रुपये शेकडा असा हंगामातील व बाजार समितीच्या इतिहासातील उच्चांक बाजारभाव मिळाला आहे.

ठळक मुद्देआवक घटली : बाजार समितीच्या इतिहासातील सर्वांधिक भाव

पंचवटी : गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीर शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दिवसेंदिवस दर वाढत चालले असून, मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाला ३३ हजार १०० रुपये शेकडा असा हंगामातील व बाजार समितीच्या इतिहासातील उच्चांक बाजारभाव मिळाला आहे.काही दिवसांपूर्वी आडत सुरू असताना कोथिंबीर २७ हजार रुपये शेकडा प्रति दराने विक्री झाली होती. मंगळवारी कोथिंबीर जुडीला ३३१ रुपये असा इतिहासातील उच्चांकी तीन आकडी बाजारभाव मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कळवण तालुक्यातील शेतकरी काशीनाथ बाळू कामडी यांनी विक्रीसाठी आणलेल्या प्रति जुडीला ३३१ रुपये, असा बाजारभाव मिळाला. नाशिक बाजार समितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. कामडी यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीर माल विक्रीसाठी आणला होता. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर प्रति जुडीला शंभर, दीडशे, दोनशे, सव्वादोनशे ते थेट अडीचशे रुपये असा बाजारभाव मिळत आहे. भाव वाढत चालल्याने ग्राहकांना कोथिंबीर घेण्यासाठी कमीत कमी शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे.शेतकरी आनंदीउच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेला माल दत्तू अपसुंदे या व्यापाºयाने खरेदी केला, तर अन्य व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीर दोनशे, सव्वादोनशे, अडीचशे, तीनशे रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती