शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बरोबर अकरा वर्षांपूर्वी.

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

बरोबर अकरा वर्षांपूर्वी.

..नाशिक : तत्कालीन केंद्र सरकारने आखाडे, मठ व आश्रमाच्या मोकळ्या जागा व संपत्ती ताब्यात घेण्याचा सुरूकेलेला प्रयत्न व त्यातून साधू-महंतांमध्ये निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरची तपोभूमी तप्त झालेली होती. बारा वर्षांनी गोदावरीच्या उगमस्थानावर भरणाऱ्या कुंभमेळ्याची त्याला पार्श्वभूमी असल्याने सरकारचा निषेध म्हणून त्र्यंबकच्या पुरोहित संघाने कुशावर्तात आयोजित केलेल्या ध्वजारोहणावरच बहिष्काराची घोषणा केली गेली आणि ध्वजारोहणासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, आदिवासीमंत्री व केंद्रीय राज्यमंत्र्यांवरच तोफ डागण्यात आली. प्रसंगबरोबर अकरा वर्षांपूर्वीचा. ३० जुलै २००३ रोजी सिंहस्थाच्या पवित्र पर्वाचा प्रारंभच मुळात वादाने सुरू झाला. त्यामुळे पुरोहित संघाच्या ध्वजारोहणानंतर १० आॅगस्ट रोजी होणाऱ्या आखाड्यांच्या ध्वजारोहणापर्यंत हा वाद कायम होता. त्र्यंबकेश्वरी शैवपंथीयांच्या भरणाऱ्या या कुंभासाठी दहा आखाडे आहेत. त्यात श्री तपोनिधी आनंद आखाडा, श्री तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री शंभुपंच दशनाम जुना आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचअग्नी आखाडा, श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी, श्री शंभुपंच दशनाम आवाहन आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा यांचा समावेश आहे. ३० जुलै रोजी पुरोहित संघाच्या ध्वजारोहणानंतर प्रतिदिवशी एकेक आखाड्यांचे ध्वजारोहण करण्यात आले. १० आॅगस्ट रोजी त्याची समाप्ती करण्यात आली. ‘बम बम भोले, हर हर महादेव’ अशा घोषणा व गगनभेदी शंखनिनाद करीत, नागासाधूंच्या उपस्थितीत अखेरच्या आखाड्याचे ध्वजारोहण होऊन देवदेवतांची प्रतिष्ठापणा करण्यात आली. प्रत्येक आखाड्याचा धर्मध्वज पारंपरगतपणे वेगळा असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक आखाड्यात ध्वजारोहणप्रसंगी हजर राहून प्रमुख साधू-महंतांचे पुष्पहार घालून स्वागत केले.