नाशिक : इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक ५३च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक अर्चना जाधव यांचे पती संजय सुपडू जाधव यांचा डेंग्यूसदृश आजाराने गुरुवारी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना, त्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या घरात डेंग्यूसदृश आजाराने दु:खद घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या मंगळवारी (दि. ११) संजय सुपडू जाधव (४५) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने गंगापूररोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जाधव यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार केले जात असतानाच प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पंचवटी येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
नगरसेवकाच्या पतीचा मृत्यू
By admin | Updated: November 13, 2014 23:44 IST