शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचे प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:38 IST

सिन्नर: पाणी पुरवठ्याच्या बेकायदेशीर निविदा मंजूर करण्यासह ठेकेदाराला जादा आर्थिक फायदा मिळवून दिल्या जात असल्याची तक्रार करीत नगरसेविका शीतल कानडी यांनी सोमवारपासून परिषदेच्या पायऱ्यांवर उपोषणास प्रारंभ केला आहे. एकाही अधिकाऱ्याने या तक्रारीची दखल न घेतल्याने मंगळवार (दि. १६) पासून सहकारी नगरसेवकांना सोबत घेऊन साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती कानडी यांनी दिली.

ठळक मुद्दे सिन्नर नगर परिषद: ठेकेदाराला पाणी पुरवठ्याची जादा बिले दिल्याची तक्रार

२ डिसेंबर २०१९ रोजी पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा वितरण व्यवस्थाकामी तसेच योजनेची जलवाहिनी देखभाल व दुरुस्तीकामी नगर परिषदेकडून खुली निविदा मागविण्यात आली होती. त्यात काही अटी व शर्थी टाकण्यात आल्या होत्या; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार करीत नगरसेविका कानडी यांनी थेट नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर उपोषणास प्रारंभ केला आहे. नगर परिषदेकडे प्राप्त सर्व ऑनलाइन निविदांच्या प्रति व संपूर्ण प्रक्रियेची माहिती तीन दिवसात द्यावी अन्यथा आपल्याला जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे तक्रार करावी लागेल, असे कानडी यांनी म्हटले आहे. त्यानंतरही आपल्याला न्याय न मिळाल्यास जनतेच्या पैशाची लूट थांबविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असे कानडी यांनी म्हटले आहे. दरम्यान, कानडी यांच्या उपोषणस्थळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मेहमूद दारुवाला यांच्यासह सहकारी नगरसेवकांनी भेट देऊन पाठिंबा दिला.आजपासून साखळी उपोषणनगरसेवक शीतल कानडी यांनी नगर परिषदेच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केल्यानंतर मुख्याधिकारी किंवा पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती दिली नाही, त्यामुळे कानडी यांनी मंगळवारपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. या उपोषणात उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्यासह नगरसेवक सहभागी होणार असल्याची माहिती कानडी यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका