शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी मनपाचे दोन ऑपरेशन थिएटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 01:49 IST

कोरोनाच्या संकटापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचे संकट नाशिकसमोर उभे राहिले आहे. सध्या खासगी रुग्णालयातच यासंदर्भातील उपचार हेात आहेत. मात्र, आता महापालिकेने उपचारांसाठी पुढाकार घेतला आहे. बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर तयार करण्यात येणार असून, आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

ठळक मुद्देआयुक्त जाधव : प्रशासनाकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव

नाशिक : कोरोनाच्या संकटापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचे संकट नाशिकसमोर उभे राहिले आहे. सध्या खासगी रुग्णालयातच यासंदर्भातील उपचार हेात आहेत. मात्र, आता महापालिकेने उपचारांसाठी पुढाकार घेतला आहे. बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर तयार करण्यात येणार असून, आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याचे आढळले होते. मात्र, त्याच्या कैकपटीने अधिक रुग्ण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळले आहेत. या बुरशीजन्य आजाराने डोळे, जबडे, गमवण्याची वेळ  आली असून, मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यानंतर रुग्ण दगावण्याचा धेाका अधिक आहे. स्टुरॉईडस आणि अन्य काही इंजेक्श्नचा् मारा केल्याने अशा प्रकारचे आजार होत असून, विशेषत: मधुमेहींना त्याचा संसर्ग अधिक होत आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत पाच रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात नाक कान घसा, नेत्र रोग, तसेच दंतरोग तज्ज्ञ आणि मेंदूविकार तज्ज्ञांकडे त्यावर उपचार सुरू असले तरी त्याबाबत अधिकृत माहिती महापालिकेकडे नाही. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात यासंदर्भात उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचीदेखील सोय नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.ठक्कर डोमचे कोविड सेंटर करणार बंद महापालिकेच्या वतीने समाज कल्याण, मेरी तसेच ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आली होती. यातील रुग्ण संख्या आता कमी होत आहे. त्यामुळे ठक्कर डोम कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुग्ण आहेत. त्यामुळे आता नवीन रुग्ण या ठिकाणी दाखल करण्यात येणार नाही, तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कोविड सेंटर बंद ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMucormycosisम्युकोरमायकोसिस