शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा वनमहोत्सव यंदा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:24 IST

नाशिक : पावसाळा तोंडावर आल्याने विविध विभागांची कामे सुरू होऊ लागलीअसली तरी शासनाच्या वनखात्याचा महत्त्वांकाक्षी उपक्रम मात्र यंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेला यंदा वीस हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, लॉकडाउनमुळे निविदाप्रक्रिया रखडली असल्यानेयंदा वृक्षारोपणाची शक्यता कमीच आहे.

नाशिक : पावसाळा तोंडावर आल्याने विविध विभागांची कामे सुरू होऊ लागलीअसली तरी शासनाच्या वनखात्याचा महत्त्वांकाक्षी उपक्रम मात्र यंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेला यंदा वीस हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, लॉकडाउनमुळे निविदाप्रक्रिया रखडली असल्यानेयंदा वृक्षारोपणाची शक्यता कमीच आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण आणि उद्यानांवर विशेष भर दिला जात आहे. तसेच दोन वर्षांपासून शहरात देवराई संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यासाठी अभिनेता सयाजी शिंदे यांची मदत घेण्यात आली होती. बंद पडलेल्या पुष्पोत्सवासदेखील सुरुवात झाली आहे. याशिवाय यापूर्वीच्या सरकारातील वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी वनखात्यामार्फत वनमहोत्सवाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यातदेखील महापालिकेने उद्दिष्टपूर्तीपेक्षा जास्त रोपे लावून संवर्धन केले होते. उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांनी वनखात्याच्या सूचनेनुसार बांबू लागवडीवरदेखील भर दिला. विशेषत: नदीकाठी बांबू लागवड करण्यात आली होती. तसेच वनधन योजनेअंतर्गत शिवाजी उद्यानात झाडे लावण्यात आली होती. यंदा मनपाला २० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट वनखात्याने दिले. त्यानुसार महापालिकेने तयारी केली होती. मात्र, गेल्या लॉकडाउन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्यांनतर सर्वच कामकाज ठप्प झाले. त्यामुळे वृक्षलागवडीसाठीची निविदा रखडली. आता निविदाप्रक्रिया राबविल्या तरी स्थायी समिती किंवा तत्सम प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. ती मिळणे कठीण आहे आणि ती मिळाली तरी खड्डे खोदणे आणि रोपे लावण्यासाठी मजूर लागणार असून ते उपलब्ध होणे कठीण आहे.-----------वृक्षछाटणीसाठी लवकरच काढणार निविदापावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या वतीने विविध कामे करताना धोकादायक झाडे काढणे तसेच वीजतारा किंवा अन्य धोकादायक वृक्ष हटविण्याचे काम केले जाते. परंतु यंदा महावितरणने या कामाला हात घातला असला तरी महापालिकेचे काम रखडले आहे. महापालिकेच्या वतीने यंदा धोकादायक वृक्ष हटविण्यासाठी किंवा फांद्या तोडण्याचे काम विभागनिहाय देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी निविदा प्रक्रियाच अद्याप राबविली गेलेली नाही. तथापि, लवकरच निविदा मागवून हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक