शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पालिकेला मिळणार 64 कोटी

By admin | Updated: December 23, 2015 00:02 IST

थकीत सिंहस्थ अनुदान : गुणवत्ता प्रमाणपत्रानंतर कार्यवाही

नाशिक : महापालिकेला दीर्घ प्रतीक्षेनंतर सिंहस्थांतर्गत थकीत २०२ कोटी रुपयांपैकी ६४ कोटी रुपयांचे अनुदान सोमवारी (दि.२८) हातात पडण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रलंबित देयके अदा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आधी कामांची गुणवत्ता प्रमाणपत्रे सादर करा, त्यानंतरच निधी अदा करण्याचा पवित्रा जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी वितरणास हिरवा कंदील मिळाला असून, लेखा विभागाने त्यास दुजोरा दिला आहे.महापालिकेने सिंहस्थ कामांसाठी शासनाकडे १११९ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यातील २०० कोटी रुपये भूसंपादनासाठी महापालिकेने उभे करायचे होते, तर उर्वरित ९१९ कोटी रुपयांमध्ये ७५ टक्के हिस्सा म्हणजे ६८९ कोटी रुपये राज्य शासन महापालिकेला सिंहस्थ अनुदान म्हणून अदा करणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी १८ सप्टेंबरला संपली. पर्वकाळातच महापालिकेला शासनाकडून ४८७ कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. २०२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त होणे बाकी आहे. सिंहस्थ पर्वकाळ उलटून अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून निधी वितरित होत नव्हता.