शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:58 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पाथरे खुर्दचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. पाथरे खुर्द येथील ७६ वर्षीय पुरुष आपल्या शस्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाला होता.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पाथरे खुर्दचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. पाथरे खुर्द येथील ७६ वर्षीय पुरुष आपल्या शस्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाला होता. कोरोनाची लक्षणे आढळल्याने याकाळातच खासगी लॅबने कोविडची तपासणी केल्याने सदर व्यक्ती पॉझिटीव् असल्याचे सांगितले. सदर व्यक्तीला नाशिक येथे पुढील तपासणी आणि उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या व्यक्तीच्या सहवातील हायरिस्कमधील चार जणांना सिन्नर येथे हलविण्यात आले असून, इतर १६ जणांना होम कॉरण्टाइन करण्यात आले आहे. पाथरे खुर्द येथील परिसर जिल्हा प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना भेटून आरोग्य विभागाने चौकशी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वावी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अजिंक्य वैद्य, वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पाथरे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका गायत्री मगर, खुर्दच्या सरपंच कविता गुंजाळ, उपसरपंच सुकदेव गुंजाळ, वारेगावचे सरपंच मिननाथ माळी, बुद्रुकचे सरपंच शरद नरोडे, माजी सरपंच मच्ंिछद्र चिने, ग्रामसेवक नितीन मेहेरखांब, आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी सदरच्या कुटुंबातील सदस्यांची, आजूबाजूच्या व्यक्तींची चौकशी केली.-----------------येथील बुधवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच गावातील व्यवहार चार दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. कोणीही बिगरमास्कचे गावात फिरणार नाही तसेच उगाचच गावात गर्दी करणार नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पाथरेत या अगोदरही दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. ते दोन्हीही रुग्ण निगेटिव्ह झाल्याने पाथरेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता; पण आता पुन्हा रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक