शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:32 IST

सिन्नर : गर्भवती महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे तसेच नवजात बालकही कोरोनामुक्त असावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी करण्याचा उपक्रम सिन्नर आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.

सिन्नर : गर्भवती महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे तसेच नवजात बालकही कोरोनामुक्त असावे यासाठी आरोग्यविभागाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी करण्याचा उपक्रम सिन्नर आरोग्य विभागाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. येत्या ३० तारखेच्या आत गर्भारपणाचा काळ संपून प्रसूत होणाऱ्या तालुक्यातील चार कंटेन्मेंट झोनमधील ११ गर्भवती महिलांच्या घशातील स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात असा उपक्रम राबविणारा सिन्नर हा पहिला तालुका ठरला आहे.तालुक्यात वारेगाव, वडगाव -सिन्नर, सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसर आणि डुबेरे नाका येथील माधवबाग परिसर या चार ठिकाणी ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही चारही ठिकाणे आरोग्य विभागाने कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. सध्या त्यातील वारेगाव येथील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात आले आहे.शिवाजीनगर येथील ५, वडगाव - सिन्नर येथील ३, वारेगाव येथील ३ अशा ११ गर्भवतींचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय वडगाव-सिन्नर या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी प्रसूत झालेली महिला आणि तिच्या दोन दिवसाच्या बाळाचाही स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आला आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील, डॉ. योगीता ठाकरे, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. सुशील पवार, डॉ. संजय वळवे, प्रतिबंधित क्षेत्रातील आशा, अंगणवाडीसेविका यांच्या सर्वेक्षणातूनगर्भवती महिलांची माहितीसंकलित करण्यात आलीआहे. टेक्निशियन नितीनघोटेकर, प्रवीण हायलिंगे यांनीया महिलांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले.

टॅग्स :Nashikनाशिक