मालेगाव कॅम्प : मालेगावी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाºया दहीहंडी कार्यक्रमावर यंदा कोरोना महामारीचे विरजण पडले आहे.शहरात कोठेही दहीहंडी साजरा होणार नसल्याने कृष्णभक्तांचा हिरमोड झाला आहे. मालेगावी मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम अनेक मित्रमंडळांकडून साजरा केला जातो. हंडी फोडणाºया गोविंदा पथकास बक्षिसे दिले जाण्याची प्रथा आहे.आगामी दोन दिवसात दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात; परंतु यंदा सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. शहरातील संगमेश्वर, स्टेट बँक, बारा बंगला, साठ फुटी रस्ता, सटाणा नाका, मालेगाव कॅम्प परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते.या भागात हजारोच्या संख्येने गोविंदाभक्त, पथक एकत्र येतात; पण त्यांचा हिरमोड झाला आहे. यंदा या भागात शुकशुकाट पहायला मिळणार आहे.
मालेगावी दहीहंडीवर कोरोनाचे विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:07 IST
मालेगाव कॅम्प : मालेगावी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाºया दहीहंडी कार्यक्रमावर यंदा कोरोना महामारीचे विरजण पडले आहे.
मालेगावी दहीहंडीवर कोरोनाचे विरजण
ठळक मुद्देयंदा सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.