शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला रॅपिड टेस्टमुळे दोन तासात कोरोनाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:12 IST

सिन्नर : उपजिल्हा रुग्णालयाने ३०० रॅपिड अ‍ॅँटिजेन टेस्ट किटची मागणी सरकारकडे केली होती. या किट तीन दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याने आता कोरोना तपासणीचे अहवाल अवघ्या दोन ते तीन तासात मिळू लागले आहेत.

सिन्नर : उपजिल्हा रुग्णालयाने ३०० रॅपिड अ‍ॅँटिजेन टेस्ट किटची मागणी सरकारकडे केली होती. या किट तीन दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याने आता कोरोना तपासणीचे अहवाल अवघ्या दोन ते तीन तासात मिळू लागले आहेत.शहर आणि तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने त्यांचे हायरिस्क आणि लो-रिस्क कॉन्टॅक्ट संशयितांची संख्याही वाढू लागल्याने आरोग्य विभागावर प्रचंड ताण पडू लागला आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगनंतर संशयितांचे स्वॅब घेणे, रिपोर्ट पाठविणे यात कमालीचा वेळ जातो. शिवाय पाठविलेल्या स्वॅबचे अहवाल येण्यासही दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा भार वाढण्यासोबतच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत होते. याशिवाय संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत दोन-तीन दिवस ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात तसेच इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे लागते. परिणामी बाधित रुग्ण आणि संशयितांची संख्या वाढत असल्याने बेड कमी पडत आहेत. याशिवाय शहर तसेच तालुक्यातही संभ्रमाचे वातावरण पसरते. बाधित रुग्णांचे हायरिस्क कॉन्टॅक्ट संशयिताना दाखल केल्यानंतर त्यांच्या तपासणीचा अहवाल झटपट प्राप्त व्हावा यासाठी आरोग्य विभागाने शासनाकडे रॅपिड अ‍ॅँटिजन टेस्ट किटची मागणी केली होती. संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने आरोग्य विभागास ३०० किट उपलब्ध करून दिले.यापैकी दोन दिवसात 192 जणांची तपासणी करण्यात आली असून 38 पॉझिटिव्ह आले.आरोग्य विभागाने आणखी 500 किटची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक