पंचवटी : गर्दीच्या ठिकाणी कोरोना आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका धार्मिक स्थळांना आणि देवदेवतांच्या मंदिरांना बसला आहे. सिंहस्थ कुंभनगरी म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीतदेखील दैनंदिन देवदर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या पन्नास टक्के घटली आहे. नाशिकला आलेले भाविक पंचवटीत तपोवन, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, रामकुंड, कपालेश्वर मंदिर या ठिकाणी येत असतात.गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये परराज्यातून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोना आजाराचे संशयित आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पंचवटी परिसरात असलेल्या मंदिरांत देवदर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या घटल्याने त्याचा परिणाम विविध व्यावसायिक, फळविक्र ेते, हॉटेलचालक आणि विविध वस्तू विक्रे त्यांवर झालेला दिसून येत आहे.सध्या श्री काळाराम मंदिरांसह रामकुंड येथे भाविकांची गर्दी कमी झाली आहे. भाविक संख्येत घट झाली असली तरी दैनंदिन धार्मिक विधी नित्य नियमाने सुरू आहेत. भाविकांच्या गर्दीने फुलणारे रस्ते गेल्या काही दिवसांपासून ओस पडले आहे.
कोरोनाच्या धास्तीने भाविकांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:13 IST