शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

चांदवड शहरात कोरोनाचा पहिला बळी; ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू; बाधितांची रुग्णसंख्या पोहोचली पाचवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चांदवड : येथे ५९वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सदरचा रुग्ण कल्याण येथे रेल्वेत नोकरीस होता, ...

ठळक मुद्देचिंतेत भर : आरोग्य विभागातर्फे शहरात घरोघरी जाऊन जनजागृती; सर्वेक्षण 

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथे ५९वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सदरचा रुग्ण कल्याण येथे रेल्वेत नोकरीस होता, तर तो मूळचा चांदवड येथील राहणारा आहे. येथील डीसीएचसी केंद्रात काम करणाऱ्या २५ वर्षीय कोविडयोद्ध्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चांदवडकरांची चिंता वाढली असून, आता शहराची संख्या पाचवर गेली आहे.शहरातील मुल्लावाडा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १६ संशयित व्यक्तीचे अहवाल गुरुवारी दुपारी निगेटिव्ह आले आहेत तसेच डीसीएचसी केंद्र चांदवड येथे कार्यरत कर्मचारी यांच्यापैकी एक २५ वर्षीय पुरुष कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर मोरेमळा येथील ५९ वर्र्षीय मयत इसमाचा अहवाल प्राप्त झाला असून, तोही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली.येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. १६) रात्री उशिरा एक ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. सदरचा रुग्ण कल्याण येथे रेल्वेत नोकरीस असल्याचे सांगण्यात आले तर त्यास निमोनियाची लक्षणेहोती.मृत व्यक्ती मोरे मळा, आयटीआय रोड येथील रहिवाशी होते. नांदगाव येथे रेल्वेमध्ये लॉकडाऊन काळात दोन महिने काम करून ते कल्याण येथे रेल्वेत नोकरीस गेले. त्यांना कल्याण येथे खूपच त्रास होऊ लागल्याने तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना आपल्या घरी जाऊन तेथील सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. चांदवड येथे आल्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन कोणतेही उपचार घेतले नाही.अतिगंभीर अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असता मृत म्हणून घोषित केले. त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे सिद्ध झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे चांदवडकरांची चिंता वाढली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य