शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या बंदिस्त जीवनात तरु णाईची किल्ले भ्रमंतीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:13 IST

लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत येथील तरु णाई कसमादे भागातील विविध किल्ल्यांवर चढाई करत स्थानिक पर्यटन करून घेत आहेत.

ठळक मुद्देइतिहासाला उजाळा : स्थानिक पर्यटन करून घेत आहेत आनंद

लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत येथील तरु णाई कसमादे भागातील विविध किल्ल्यांवर चढाई करत स्थानिक पर्यटन करून घेत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घरीच रहा-सुरक्षित रहा या संदेशाचे पालन करत मंडळी सुरु वातीला दोन-तीन महिने घराबाहेर पडली नाहीत. परंतु नंतर मात्र कंटाळवाणे वाटू लागल्याने काही हौशी मंडळींनी मास्क, सॅनिटायझर वापरत व सुरक्षति अंतर राखत येथील गड-किल्ल्यांवर भ्रमंतीचा पर्याय स्वीकारला. तेथील फोटो व्हाट्सएप, फेसबुकवर टाकल्याने इतरांनीही त्यांचे अनुकरण करत एकेक गड-किल्ला पाहण्यास सुरु वात केली. यामुळे येथील दुर्लक्षित गड, किल्लेही उजेडात आले. विनाकारण इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा परिसरातील गड, किल्ले व तेथील इतिहास जाणून घेत ही तरु णाई कोरोनात विरंगुळा मिळवत आहेत. या भागात असे अनेक ग्रुप आहेत कि जे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत.या भागात धोडप, मार्केण्डेय, अहिवंतगड, रावळ्या-जावळ्या, कांचनगड, राजधेर, इंद्रायी, अंकाई, साल्हेर, चौल्हेरगड , कण्हेरगड, रामशेज आदी किल्ले आहेत. इतर किल्ल्यांच्या मानाने हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. परंतु आता या किल्ल्यांचा इतिहास उलगडू लागल्याने त्यांचे महत्त् वाढू लागले आहे. यामुळे स्थानिकांना व्यवसाय व रोजगार सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या या किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे फक्त त्याला उजाळा मिळण्याची गरज आहे. कोरोनाकाळात त्याची सुरु वात झाली आहे, हे नक्की!कोरोनाकाळात आम्ही आठ किल्ल्यांवर भ्रमंती केली. स्वराज्याच्या इतिहासाचे हे किल्ले साक्षीदार आहेत. हा इतिहास शोधून काढत तो सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी छायाचित्रे व माहितीचे संकलन करत आहोत.- शरद पगार, खुंटेवाडीखरोखर या किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे. या किल्ल्यांवर पर्यटन करणे सोपे जावे म्हणून माझे नियोजन चालू आहे. स्थानिकांना रोजगार मिळेल. आगामी काळात येथील पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल.- किरण पगार, कळवणफोटो :अहिवंतगडावरून सभोवतालच्या प्रदेशाचे निरीक्षण करत व किल्लेचढाईचा आनंद व्यक्त करताना युवक. (05लोहोणेर1)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र