शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वारियर्सलाच मनपाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 22:59 IST

नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढण्याचे धारिष्ट्य दाखविणारे नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मात्र वेगळ्याप्रकारे दणका दिला असून, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन ५० टक्के कापण्यात आले आहे.

नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढण्याचे धारिष्ट्य दाखविणारे नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मात्र वेगळ्याप्रकारे दणका दिला असून, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन ५० टक्के कापण्यात आले आहे.विशेष म्हणजे हे वेतन कपात करताना त्यांच्या वेतन चिठ्ठीवर गैरहजर असा उल्लेख करण्यात आला आहे. महापालिका प्रशासन आणि लेखा विभागाच्या कारभारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.नाशिक शहरात महापालिकेची मोठी चार रुग्णालये असून, त्यात हजारो नागरिक दररोज उपचारासाठी येतात. अनेक खासगी दवाखाने, महापालिकेचे दवाखाने मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होते. दवाखान्यात येणारा रुग्ण कोरोना संसर्ग बाधित आहे किंवा नाही याची पुरेशी कल्पना नसताना त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत जोखमीचे आहे. असे असतानाही महापालिका रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी निष्ठेने रुग्णसेवा करीत आहेत. महापालिकेने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय कोरोना संशयित आणि बाधितांसाठी विशेष रुग्णालय घोषित केले असले तरी अन्य रुग्णालयांतदेखील कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाºयांकडे व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे नसतानाही हे कर्मचारी काम करीत आहेत. अशावेळी त्यांचे वेतन कापल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांचे वेतन कापले जाणार नाही, असे वित्तमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. असे असतानाही महापालिकेने मात्र वैद्यकीय विभागातील कर्मचाºयांचे पंधरा दिवसांचे वेतन कापले आहे. विशेष म्हणजे त्यावर पंधरा दिवस गैरहजर असा शिक्का मारल्याने भविष्यात या पुस्तिकेत त्याची चुकीची नोंद होऊ शकेल, असे वैद्यकीय विभागातील कर्मचा-यांचे म्हणणे आहे.-----महापालिकेच्या सफाई कामगारांची सेवादेखील अत्यावश्यक सेवेमध्ये येते. त्यांनीदेखील वेतनात कपात करू नये, अशी मागणी केली. प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची मागणी मान्य केली असली तरी वैद्यकीय विभागातील कर्मचाºयांना मात्र अकारण वेतन कपातीला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने चालू महिन्याच्या वेतनापोटी महापालिकेला पूर्ण जीएसटीची देय रक्कम देताना ८ टक्के वाढवून दिली आहे. असे असताना अकारण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना त्रास का दिला जात आहे, असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक