शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कमी होईना कोरोना विषाणूची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:58 IST

येवला : तालुक्यातील भायखेडा येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून शहरातील दोन बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. बाधितांच्या संपर्कातील १८ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतले आहे.

येवला : तालुक्यातील भायखेडा येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून शहरातील दोन बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. बाधितांच्या संपर्कातील १८ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतले आहे.तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०४ झाली असून यापैकी आजपर्यंत १६८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत १५ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या २१ असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगीतले. २१ बाधितांपैकी नाशिक येथील रूग्णालयात ८, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात ७ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ६ रूग्ण उपचार घेत आहेत. याबरोबरच बाभुळगाव येथील विलगीकरण कक्षात १८ हायरिस्क संशयीत रूग्ण कोरंटाईन असल्याची माहितीही डॉ. गायकवाड यांनी दिली.---------------मार्कण्डेय पर्वतावरील यात्रा रद्दओतुर : कळवण तालुक्यातील ओतुरपासुन पाच किलोमीटर अंतरावर असलेला मारकण्डेय पर्वतावर सोमवती अमावास्येला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवणचे तहसीलदार बंडू कापसे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच पर्वतावर जाणारा रस्ता बंद केला आहे. कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोदजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक