नायगाव : कोरोनामुळे संपूर्ण जगातील जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांच्या जीवनशैलीत या विषाणूने वेळेचे तसेच शिस्तीचे बंधन घालून दिले आहे. याच कोरोनाने संसाराची नव्याने सुरुवात करणाऱ्या वधू-वराच्या शुभमंगल सावधानचा मुहूर्तही हुकवला आहे. कोरोनाने सध्या लग्नांचा झट मंगनी पट शादी असा निर्माण होत असलेला ट्रेंड नागरिकांना हवाहवासा वाटू लागला आहे.कोरोना या तीनच अक्षरांनी गेल्या काही दिवसांपासून जगभर अक्षरश: कहर केला आहे. अतिसूक्ष्म असलेल्या विषाणूने अख्ख्या जगाचे जनजीवन विस्कळीत केले आहे. जगाच्या आर्थिक कोंडीबरोबरच कोरोनाने नागरिकांच्या जीवनशैलीतही मोठा बदल घडवून आणला आहे. जगाचे अतोनात नुकसान केलेल्या या महामारीने मानवाला अनेक गोष्टीही शिकविल्या आहेत. यात आदबीने व नियमांचे पालन करीत निसर्गाचा समतोल राखत जगण्याची कला शिकविली आहे. या संसर्गाने गरिबी व श्रीमंतीमधील दरीही संपविण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्रांत बदल घडवून आणले आहेत. या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमातच यंदा कर्तव्य पार पडत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विवाह पार पडत असले तरी ते मुहूर्ताचा विचार न करता जमेल त्या वेळेतच होत आहे. त्यातही अतिशय साध्या व मोजक्याच उपस्थितीत होणाºया विवाहांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.चौकटकोरोनामुळे दैनंदिन जीवनात बदल घडत असताना विवाह समारंभातही आमूलाग्र बदल घडत आहे. पारंपरिक पद्धतींना फाटा देत महिनाभर चालणारी विवाह पद्धत बंद होत आहे. समारंभातील विविध कार्यक्र मांना फाटा देऊन सध्या अतिशय साध्या पद्धतीने लग्न उरकले जात आहे.चौकटसाध्या पद्धतीने होणाºया विवाह सोहळ्यांमुळे, खर्चिक साखरपुडे, टोलेजंग हळदी समारंभ तसेच महागडी विवाह बंद झाले आहेत. त्यामुळे जागरण, गोंधळ करणारे, डीजे, बँडवाले, पुरोहित, फोटोग्राफर, घोड्यावाले, आचारी, लॉन्सवाले, भांडी, कपडा दुकानदार आदी सर्वांनाच यंदाच्या वर्षी कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे.
कोरोना विषाणूने जगाचे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:00 IST
नायगाव : कोरोनामुळे संपूर्ण जगातील जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांच्या जीवनशैलीत या विषाणूने वेळेचे तसेच शिस्तीचे बंधन घालून दिले आहे. याच कोरोनाने संसाराची नव्याने सुरुवात करणाऱ्या वधू-वराच्या शुभमंगल सावधानचा मुहूर्तही हुकवला आहे. कोरोनाने सध्या लग्नांचा झट मंगनी पट शादी असा निर्माण होत असलेला ट्रेंड नागरिकांना हवाहवासा वाटू लागला आहे.
कोरोना विषाणूने जगाचे जनजीवन विस्कळीत
ठळक मुद्देया संसर्गाने गरिबी व श्रीमंतीमधील दरीही संपविण्याचा प्रयत्न केला आहे.