शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टेस्ट ‘निगेटिव्ह’;  कांदा लिलाव ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:06 IST

सिन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा लिलावासह नायगाव उपबाजारातील कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. यामुळे नांदूरशिंगोटे व दोडी या कांदा लिलावासाठी प्रसिध्द असलेल्या दोन्ही उपबाजारातही लवकरच कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांच्यासह संचालक मंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्देसिन्नरसह नायगावला लिलाव सुरळीत

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा लिलावासह नायगाव उपबाजारातील कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. यामुळे नांदूरशिंगोटे व दोडी या कांदा लिलावासाठी प्रसिध्द असलेल्या दोन्ही उपबाजारातही लवकरच कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांच्यासह संचालक मंडळाने घेतला आहे.बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मंगळवारपासून कांदा व शेतमालाच्या लिलावास प्रारंभ झाला. कोरोना नियमांची अंमलबजावणी करीत व्यापारी, शेतकरी व कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जात होता. मंगळवारी १५० जणांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. तर बुधवारी ५० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्वजण निगेटिव्ह आल्याने व्यवहार सुरळीत झाले. बुधवारी सिन्नरच्या मुख्य आवारात २१०० क्विंटल कांदा आवक झाली होती. कमाल भाव १६०० तर सरासरी भाव १४०० रुपये राहिला. नायगाव उपबाजारातही ५७ वाहनांतून ७१० क्विंटल कांद्याची आवक झाली. नायगाव येथे कमाल भाव १७५० तर किमान भाव १४५० राहिला.नांदूर व दोडी उपबाजार सुुरु होणारसिन्नर व नायगाव उपबाजार सुरळीत झाल्यानंतर नांदूरशिंगोटे व दोडी उपबाजार सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिव विजय विखे  यांनी दिली. नांदूरशिंगोटे उपबाजार शुक्रवार (दि. २८) रोजी तर दोडी उपबाजार बुधवार (दि. २ जून) रोजी सुरु होणार आहे. उपबाजारात प्रवेश करणाऱ्यांना रॅपिड टेस्ट बंधनकारक असणार आहे. निगेटिव्ह टेस्ट येणाऱ्यांना आत प्रवेश दिला जात होता.  याशिवाय मास्क, सामाजिक अंतर पाळणे आणि कोरोना संबंधीचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे सचिव विजय विखे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती