शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांना मिळते सकस जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 00:01 IST

लासलगांव : ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून येथील कांदा व्यापारी चोथानी परीवार गावातील कोरोना रुग्णांकरीता आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने रोज जेवण पुरविण्याची सेवा करीत आहेत.

ठळक मुद्देलासलगाव : चोथानी परिवार अन‌् मित्र मंडळाचा उपक्रम

लासलगांव : ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून येथील कांदा व्यापारी चोथानी परीवार गावातील कोरोना रुग्णांकरीता आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने रोज जेवण पुरविण्याची सेवा करीत आहेत.कांदा व्यापारात फारशी उसंत मिळत नाही, तरी सामाजिक बांधिलकी म्हणुन लासलगाव येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळाकडून कोरोना रुग्णांची दोन वेळच्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था सेवा दीड महिन्यापासून सुरू केल्याने या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण कुटुंब व्यवस्था हादरून गेली असताना हॉस्पिटलला दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सकस जेवण येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळी सुमारे ७० ते ८० रुग्णांना रोज दोन वेळचे जेवणाचे डबे पुरवले जात आहे.वरण, भात, पोळी, भाजी, खिचडी, सलाड, ताक, चटणी, कांदा, लिंबू व्यवस्थीत पॅक करून रुग्णांना दोन वेळ पुरविले जात असून आजपर्यंत परिसरातील दोन ते अडीच हजार रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.विंचूररोडवरील चोथानी यांच्या कांद्याच्या खळ्यात स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था केली आहे, याठिकाणी स्वयंस्फूर्तीने मदत कार्य केले जात असून गेल्या दीड महिन्यापासून चोथानी कुटुंब व त्यांच्या मित्रपरिवारासह राबतांना दिसत आहे.चौकट.....विशेष म्हणजे या परिवाराने कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पोचवण्याचे तसेच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. कोणताही आर्थिक मोबदला न घेता स्वखर्चाने वेगवेगळ्या राज्यात या कामगारांना पोहोचवण्यात आले होते.विशेष म्हणजे हे कार्य चालू असताना परिसरात कोणत्याही मुक्या जनावरांना अपघात की व्याधी झालेली असल्यास या ग्रुपकडून सेवा केली जात आहे.या उपक्रमासाठी पुरुषोत्तम चोथानी, प्रतीक्षा चोथानी, ओम चोथानी, प्रतिक्षा चोथानी, गायत्री चोथानी, प्रतिक चोथानी, भगवती राणा, शामलता ऊपाध्ये, विशाल पालवे, सुरज नाईक, अजिंक्य खांगळ, अभिजित जाधव, सुरज आब्बड, त्र्यंबक ऊपाध्ये, सागर चोथानी, प्रियंका चोथानी, समीर गुंजाळ, अमित वर्मा, प्रमोद खाटेकर, सपना चोथानी, कृष्णा चोथानी यांच्या सह अनेकव्यक्ती या उपक्रमात सहभागी आहेत.या उपक्रमात जेवणाच्या सुविधेबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, ऑक्सीजन सिलेंडर, औषधे तसेच येणाऱ्या इतर अडचणी यासाठी आम्ही मदत कार्य करत आहोत.- विशाल पालवे, लासलगांव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक