शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:47 IST

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच, त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलांचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहर पोलीस आयुक्तालयातील २५ तर ११ ग्रामीण पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान, आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेले पोलीस कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज दिसू लागली आहे.

ठळक मुद्देह्यकोविड केअर सेंटरह्ण सुरू होण्याची चिन्हे: शहरातील २५ तर ग्रामीणमध्ये ११ पोलिसांचा समावेश

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच, त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलांचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहर पोलीस आयुक्तालयातील २५ तर ११ ग्रामीण पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान, आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेले पोलीस कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज दिसू लागली आहे.एकीकडे पुन्हा फैलावणारा कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर आहेत. पोलिसांच्या कामाचा ताण आता पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र, अशा स्थितीत कोरोनाची लागण होण्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे पोलिसांकरिता जिकरीचे ठरू लागले आहे.शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ पाहत असतानाच, पोलिसांनाही या आजाराची बाधा होऊ लागली आहे. शहर पोलीस दलातील ४ पोलीस अधिकारी व ११ अंमलदार आतापर्यंत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामीण पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तेथे ११ पोलीस बाधित आढळून आले आहेत. बाधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा पुरेपूर वापरावर पुन्हा भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.पोलीस ठाण्यांना कोरोना अलर्टमागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांना ह्यअलर्टह्ण करत कोरोना आजाराला रोखण्यासाठी आपआपल्या पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाधिक खबरदारी घेण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्कचा नियमित वापर बंधनकारक करण्यात आला आहे, तसेच वेळोवेळी वाहनांचे सॅनिटायझेशन करण्यासही प्राधान्य देण्याबात सांगितले गेले आहे. वयाची पन्नाशी गाठलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गर्दीपासून कसे दूर ठेवता येईल आणि त्या दृष्टीने नियोजन करत, त्यांच्यावर कामगिरीची जबाबदारी सोपविण्याचेही नियोजन सर्वच पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस