शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आता मनपाच्या दारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:30 IST

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले असले तरी मंगळवारी (दि.१२) महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षारक्षकासच लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले असले तरी मंगळवारी (दि.१२) महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षारक्षकासच लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, काठेगल्ली हा त्याच्या राहण्याचा परिसर सील करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. दरम्यान, आता महापालिकेकडे काम करणारा हा पहिलाच कोरोनाबाधित कर्मचारी आहे.महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या विरोधात वैद्यकीय विभागाचे कर्मचारी लढा देत आहेत. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय सध्या कोरोनासाठी विशेष रुग्णालय म्हणून स्थापित करण्यात आले आहे. याठिकाणी उपचार करण्यात येते. महापालिकेच्या वतीने याठिकाणी कार्यरत सर्वच आरोग्यसेवक आणि अन्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. यावेळी याच रुग्णालयात असलेल्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी (दि.१२) स्पष्ट झाले. त्याचा घसा स्राव नमुना १० मे रोजी घेण्यात आला होता. मंगळवारी त्याचा अहवाल मिळाला. विशेष म्हणजे या रक्षकास कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे नव्हती. तसेच त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा अन्य काही नसल्याने त्याला लागण झाल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभागदेखील कारणांचा शोध घेत आहे. सदर रुग्ण राहात असलेल्या काठे गल्ली भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.नाशिक शहरात आत्तापर्यंत ३९ रुग्ण आढळले होते. यातीलकाही बाहेरून आलेले नागरिक होते, तर त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. मात्र, आता थेट व्यवस्थेतील एकाला बाधा झाल्याने कर्मचारी काहीसे धास्तावले आहेत.---२८ क्षेत्र प्रतिबंधात्मकमहापालिका क्षेत्रात आढळलेल्या या रुग्णामुळे आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या चाळीस झाली आहे. आत्तापर्यंत २८ प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. नाशिक शहरातील संख्या मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र रुग्ण संख्या वाढतच असून, ती शहरवासीयांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक