शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ६ टक्क्यांवर

By श्याम बागुल | Updated: June 2, 2020 17:10 IST

नाशिक जिल्ह्यात आजवर १२३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात ७७९ इतके, तर नाशिक महापालिका हद्दीत २१८ व नाशिक ग्रामीण भागात १७९ रुग्ण आजवर कोरोनाने पीडित सापडले.

ठळक मुद्देबरे होण्याचे प्रमाण ६८ टक्के: चाळिशीनंतर दगावणाऱ्यांची संख्या अधिकजिल्ह्यात आजवर ७३ कोरोनाबाधित रुग्ण मयत झाले

श्याम बागुलनाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यातूनच उपचाराअंति बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाने ७३ बळी घेतल्याने एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर ६ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. देशातील एकूण मृत्यूच्या टक्केवारीपेक्षा हे प्रमाण काहीसे अधिक असले तरी, कोरोनामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ६८ टक्क्यांच्या आसपास दिलासादायक आहे. कोरोनाने आबालवृद्धांना आपला विळखा घातला असला तरी, वयाच्या चाळिशीनंतरच्या रुग्णांचा यात सर्वाधिक बळी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात आजवर १२३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात ७७९ इतके, तर नाशिक महापालिका हद्दीत २१८ व नाशिक ग्रामीण भागात १७९ रुग्ण आजवर कोरोनाने पीडित सापडले. आरोग्य विभागाने अशा रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अशा उपचाराअंति बºया झालेल्या रुग्णांची संख्या ८४६ इतकी असून, त्याचे प्रमाण ६८ टक्के इतके आहे. बरे होणाºया रुग्णांमध्ये मालेगाव महापालिका व नाशिक ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात आजवर ७३ कोरोनाबाधित रुग्ण मयत झाले असून, त्यात सर्वाधिक ५५ रुग्ण मालेगाव शहरातील आहेत. त्या खालोखाल नाशिक शहरात नऊ, ग्रामीण भागात पाच रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता एकूण रुग्णांच्या तुलनेत त्याचे प्रमाण ५.९१ टक्के इतके असून, त्यातही मालेगावचा दर ७ टक्के, नाशिक शहरात ४ टक्के, तर ग्रामीणचे प्रमाण दोन टक्के इतकेच आहे. मृत्यू होणाºयांमध्ये वय १३ ते २५ वयोगटांत तिघे, २६ ते ४० वयोगटांत सहा व ४१ ते ६० वयोगटांत सर्वाधिक म्हणजे ४४ मृत्यू झाले आहे. एरव्ही कोरोना लहान बालके व वयोवृद्धांना लवकर बाधित करतो असे मानले जात असताना ६० वयोगटाच्या पुढे असलेल्या फक्त २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित १०३ रुग्ण उपचार घेत असले तरी, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या ३१७ इतकी आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५४५ इतकी आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क व लो रिस्कच्या व्यक्तींची आरोग्य तपासणीची मोहीम सुरूच असून, आजवर चार लाख, ६७ हजार ४८६ इतक्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक