शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नायगाव खोऱ्यात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:48 IST

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात कोरोनाचा शिरकाव वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नायगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया गावांमध्ये कोरोना रुग्णांनी अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी नायगाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे ग्रामपंचायतीचा निर्णय : चार दिवस गाव बंद

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात कोरोनाचा शिरकाव वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नायगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया गावांमध्ये कोरोना रुग्णांनी अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी नायगाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नायगाव खो-यातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, सोनगिरी, जोगलटेंभी आदी गावांमध्ये विशेषत: गेल्या आठवडा भरापासून कोरोनाचा शिरकाव ब्राम्हणवाडे व नायगाव येथे झपाट्याने वाढु लागल्यामुळे खो-यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच गेल्या दोन दिवसात ब्राम्हणवाडे व नायगाव येथे नव्याने रुग्ण सापडत आहे. त्यामुळे खो-यातील गावांमध्ये सध्या चिंता व्यक्त होऊ लागली आहे.नायगाव हे पंचक्रोशीचे केंद्रबिंदू असल्यामुळे येथे जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावातील नागरिक येथे दैनंदिन कामांसाठी येत असतात. या गावांमध्येही रुग्ण सापडत असल्यामुळे नायगावकर धास्तावले आहे. त्यातच गुरूवारी एक सलून चालक ३६ वर्षीय तरूण पाँझिटीव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने शुक्रवार (दि.४) पासून पुढील चार सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बन यांनी दिली. यापुढे गावात विनाकारण फिरणारे व विनामास्क फिरणा-यांना पाचशे रूपये दंड करण्यात येणार असल्याचेही बन यांनी सांगितले.नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया चिंचोली, मोह, बारागाव पिंप्री, पाट पिंप्री, सुळेवाडी, माळेगाव, कुंदेवाडी, भाटवाडी, लोणारवाडी, निमगाव सिन्नर व गुळवंच आदी गावांमध्ये आत्ता पर्यंत अडीचशे रुग्णांच्या पुढे गेला आहे. आरोग्य केंद्रा अंतर्गत आत्ता पर्यत सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.अनलाँक झाल्यापासून नागरिक सर्वत्र फिरत असतांना मास्क, सोशलडिस्टंसीग, विनाकारण न फिरणे आदी गोष्टी पाळतांना दिसत नाही. कोरोना संक्रमण सध्या याचमुळे वाढत आहे. नागरीकांनी अशा परस्थितीत लाँकडाऊन पेक्षाही अधिक सतर्क राहून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.- मनिषा वाघ, वैद्यकीय अधिकारी, नायगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल