शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निफाड शहरात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:26 IST

निफाड : कोरोनापासून अद्याप लांब असलेल्या निफाड शहरात मुंबईहून आलेला नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने शहरात धास्तीचे वातावरण पसरले आहे.

निफाड : कोरोनापासून अद्याप लांब असलेल्या निफाड शहरात मुंबईहून आलेला नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने शहरात धास्तीचे वातावरण पसरले आहे.सदर बाधित रुग्ण मुंबई येथे नोकरीस असून, त्याचे कुटुंबीय निफाडला राहते. तो निफाड येथे दि. २८ मे रोजी आला होता. त्यानंतर त्याची दि. २९ मे रोजी निफाडच्या रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्यास होम क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. काही दिवसांनी डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्याने निफाडला दोन खासगी डॉक्टरकडे तपासणी केली होती. त्यानंतर दि. ९ जून रोजी संगमनेर येथे त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर संगमनेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पत्नीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. चेतन काळे यांनी दिली. दरम्यान, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील १, विंचूर येथील २ आणि ओझर येथील १ अशा ४ जणांवर लासलगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.--------------------------शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी४रु ग्ण आढळलेला रहिवासी भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. तसेच निफाड येथे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरण्टाइन करण्यासाठी शहरातील एक शाळा व लॉन्सचा क्वॉरण्टाइन सेंटर म्हणून वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी सुरू केली असून, आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक