शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संसर्गाने बाजार समिती धास्तावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:50 IST

बाजार समितीने मध्यंतरीच्या काळात खबरदारी म्हणून सलग तीन दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद केले होते. मात्र त्यानंतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही.

ठळक मुद्देसंचालक, व्यापाऱ्याला लागण : शुक्रवारी तातडीची बैठकएका संचालकालाच कोरोना विषाणूची लागण

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपूर्वी व्यापारी व त्या पाठोपाठ एका हॉटेलचालकाला व आता एका संचालकालाच कोरोना विषाणूची लागण झाल्याने बाजार समितीतील अन्य घटक धास्तावले आहेत. बाजार समितीत होणारी गर्दी व सुरक्षित अंतर राखण्यात आलेले अपयश पाहता त्यातूनच कोरोनाला आमंत्रण मिळाल्याची भावना व्यक्त केली जात असून, योजलेल्या सर्व उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत.

बाजार समितीने मध्यंतरीच्या काळात खबरदारी म्हणून सलग तीन दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद केले होते. मात्र त्यानंतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन शेकडो शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग सर्वत्र वाढत चालल्याने त्या पाशर््वभूमीवर बाजार समितीने पाहिजे तशी दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही, असा आरोप बाजार समितीतील व्यापारी व काही संचालकांनी केला आहे. दिंडोरीरोडला बाजार समिती मुख्य प्रवेशद्वाराजवळ संचालक मंडळांनी केवळ कोरोनापासून काय उपाययोजना करायची याची फलकबाजी करण्यातच धन्यता मानली असून, बाजार समितीत प्रवेश केल्यानंतर वाहनचालकांची स्क्रिनिंग केले जात असले तरी सॅनिटायझर कक्ष केवळ नावालाच उभारला असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.संपूर्ण जिल्ह्यासह नाशिक शहरातदेखील कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतदेखील कोरोनाने शिरकाव केला असला तरी बाजार समिती प्रशासनाने पाहिजे ती दखल घेतली नसल्या कारणामुळे आगामी कालावधीत बाजार समितीत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून रुग्णसंख्येत भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक