कोरोनामुळे वाढली ऑनलाइन शिक्षणाची अपरिहार्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:41+5:302021-06-25T04:12:41+5:30

सिद्धार्थ राजगढिया यांनी बदलत्या काळानुसार ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य होते. मात्र, कोरोनाकाळात ते अपेक्षेपेक्षा अधिक लवकर स्वीकारावे लागले. या शिक्षण ...

Corona increased the inevitability of online learning | कोरोनामुळे वाढली ऑनलाइन शिक्षणाची अपरिहार्यता

कोरोनामुळे वाढली ऑनलाइन शिक्षणाची अपरिहार्यता

googlenewsNext

सिद्धार्थ राजगढिया यांनी बदलत्या काळानुसार ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य होते. मात्र, कोरोनाकाळात ते अपेक्षेपेक्षा अधिक लवकर स्वीकारावे लागले. या शिक्षण पद्धतीचा ज्या शिक्षकांनी चांगला उपयोग करून ते आत्मसात केले, ते शिक्षक प्रभावीपणे अध्यापन करू शकतात. ऑनलाइन शिक्षणात मुलांचे पुरेसे लक्ष केंद्रित नसते किंवा ते उपस्थित राहत नाहीत, अशा प्रकारची तक्रार गैर आहे. उलट तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन क्लासरूममध्ये मुले किती वेळ उपस्थित होती, त्याची अचूक वेळ मिळते आणि पालकांना ते कळवता येते, असेही ते म्हणाले.

जयंत मुळे यांनी ऑनलाइन शिक्षण देताना पालक आणि शिक्षकांना प्रचंड कसरत करावी लागत असते, तसेच मुलांचे व्यवधान टिकवून ठेवणे शक्य होत नाही. प्रत्यक्ष मुलांना समोर बसवून शिक्षकांना मुलांना विषय समजला किंवा नाही, ते चटकन समजते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात ही मर्यादा येते, असे मत व्यक्त केले, तर योगेश पंचाक्षरी यांनी मुलांना ज्ञानाधिष्ठित शिक्षण म्हणजेच शिक्षण हे ज्ञानासाठी घेतले असल्याचे संस्कार केले, तर बऱ्यापैकी मुले अध्यापनाकडे लक्ष पुरवू शकतील, असे सांगितले. ऑनलाइन पद्धतीने शिक्षणामुळे हुशार मुलांची अडचण नाही; परंतु मध्यम आणि अभ्यासात अत्यंत कच्चे असलेल्या मुलांची अडचण होऊ शकते, असे सांगितले.

इन्फो..

शाळेचे वेळापत्रक झाले लवचिक

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शाळांचे वेळापत्रक लवचिक झाले आहे. मुलांनी दोन तास ऑनलाइन क्लासरूममध्ये थांबल्यानंतर त्यांना वेगळवेगळ्या प्रकारचे शिक्षण, स्वयंअध्ययन करण्यासाठी वेळही देता येईल. त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ होऊ शकेल, असे मत सिद्धार्थ राजगढिया यांनी व्यक्त केले.

------

छायाचित्र डेस्कॅन १०९ नंबरने

Web Title: Corona increased the inevitability of online learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.