नाशिक : जिल्ह्यात एकूण ४४० रु ग्णांवरील कोरोनाचे विघ्न हरले, त्यांनी यशस्वीपणे मात करत आपले घर गाठले. अद्याप जिल्ह्यात २३ हजार ३६५ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी (दि.२१) जिल्हयातील कोरोना रु ग्णसंख्या आता २८ हजार ४२३ इतकी झाली. दिवसभरात उपचारार्थ दाखल १० रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७५५ वर पोहचला. शुक्र वारी ७५६ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी ४९३ नाशिक शहरातील आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रु ग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्र वारी ग्रामीण भागातून २१३ तर मालेगावात ३७ रु ग्ण मिळून आले. जिल्ह्यात १ हजार ५० संशियत रु ग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक ६७४ रु ग्ण नाशिक शहरातील आहे. शुक्र वारी मागील काही दिवसांच्या तुलनेत शहरातील कोरोना संशियत म्हणून दाखल होणारे रु ग्ण कमी झाले.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पाशर््वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत नागरिकांची विविध पुजासाहित्य खरेदीसाठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत डिस्टन्स बाळगणे खूप गरजेचे आहे.
४४० रु ग्णांवरील कोरोनाचे विघ्न टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:10 IST