शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मक्याला भोवला कोरोना, व्यापारी माल उचलेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:47 IST

दरात घसरण : प्रतिक्विंटल १८०० रुपये दर देण्याची मागणी 

ठळक मुद्देआजच्या घडीला जवळपास ३५ ते ४० टक्के मका उत्पादकांकडे शिल्लक

सटाणा : कोरोनाचा इफेक्ट मक्याच्या दरात होऊन मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे मालही व्यापारी उचलेनासे झाले आहेत. या घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ १८०० रु पये प्रतिक्विंटल दराने मका खरेदीसाठी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी सहकार व पणन मंत्री श्यामराव पाटील यांच्याकडे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चीनमधून जगभरात पोहोचलेल्या कोरोना विषाणूचा फटका मका उत्पादकांनादेखील बसला आहे. कोरोना व्हायरस आणि पोल्ट्री उत्पादन याचा कुठलाही संबंध नाही. चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट केले असले तरीदेखील सोशल मीडियावरील अफवांचा चिकन खरेदीवर परिणाम होत आहे. परिणामी प्रमुख कोंबडी खाद्य असलेल्या मका पिकाचीदेखील बाजारात मागणी घटल्याने दर कोसळले आहेत. आजच्या घडीला जवळपास ३५ ते ४० टक्के मका उत्पादकांकडे शिल्लक आहे. मात्र, बाजारभावात दिवसेंदिवस होणा-या घसरणीने मका उत्पादक चिंतित असून, महाराष्ट्रासह परप्रांतात मक्याची मागणी नाही. प्रत्येक दिवशी बाजारभावात घसरण होत असल्याने बाहेर पाठविलेला माल पुढील व्यापारी खाली करून घेत नाही. शासनाने याचा विचार करून तत्काळ मका प्रतिक्विंटल १८०० रु पये दराने मका खरेदीसाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक