शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोनामुळे आॅनलाइन घरपट्टीतही मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:48 IST

कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेला घरपट्टीची बिले प्रत्यक्ष मिळकतधारकाला देता येणार नसल्याने आॅनलाइनचा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले खरे, परंतु बंद उद्योगधंद्यामुळे त्यातही गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९० लाख रुपयांची घट आली आहे.

ठळक मुद्देसवलतीत पुन्हा वाढ : महापालिकेकडून ई-बिल पाठविणार

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेला घरपट्टीची बिले प्रत्यक्ष मिळकतधारकाला देता येणार नसल्याने आॅनलाइनचा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले खरे, परंतु बंद उद्योगधंद्यामुळे त्यातही गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९० लाख रुपयांची घट आली आहे.चौथ्या लॉकडाउनमध्ये काही व्यवसाय सुरू झाल्याने आता नागरिक घरपट्टी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने मेपर्यंत असलेली आगाऊ बिल भरण्याबद्दल देण्यात येणारी पाच टक्के सवलत आता जून महिन्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरच्या दोन महिन्यात तीन आणि दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवार (दि.२७)पासून ई-बिल (डिमांड) देखील देण्यात येणार आहे.महापालिकेच्या उत्पन्नात घरपट्टीचा मोठा वाटा असून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सव्वाशे कोटी रुपयांवर वसुली झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीची धावपळ सुरू होणार असतानाच लॉकडाउन झाल्याने महापालिकेच्या वसुलीवर प्रतिकूल परिणाम झाला.मे महिन्यात तीन तर जून महिन्यात दोन टक्के सवलत दिली जाते, त्याशिवाय आॅनलाइन सेवेमुळे अतिरिक्त एक टक्का सवलत देण्यात येते. त्यानुसार २०२०-२१ या नवीन आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहित आॅनलाइन भरणा करण्यासाठी सवलत देण्यात आली. परंतु नागरिकांचा आॅनलाइन कर भरणा करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी १ एप्रिल ते २१ मार्चदरम्यान ९ कोटी ७ लाख ६५ हजार ५०५ रुपये आॅनलाइन घरपट्टी जमा झाली होती. मात्र, यावर्षी याच कालावधीत मात्र सहा कोटी २३ लाख ३२ हजार ८६२ रुपये आॅनलाइन कर भरणा झाला असून ही तूट २ कोटी ९० लाख रुपयांची आहे. त्यामुळे घरपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने जून महिन्यापर्यंत ठेवलेली पाच टक्के बिलाची आणि एक टक्का आॅनलाइन पेमेंटची सवलत आता वाढवून जून महिन्यापर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यानंतर म्हणजे जुलैमध्ये तीन अधिक एक असे चार टक्के तर आॅगस्टमध्ये दोन अधिक एक असे तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. याशिवाय अनेक उद्योजक व्यावसायिकांना घरपट्टीसाठी डिमांड बिल लागते तेदेखील ई-बिल आॅनलाइन मिळू शकणार आहे. बुधवारपासून (दि. २७) हे बिल मिळू शकेल. त्यात शास्तीचादेखील उल्लेख असणार आहे.नागरिकांना एसएमएसद्वारे सूचनामहापालिकेकडे घरपट्टी भरताना नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर बिल भरण्याची सूचना आणि रक्कम आणि लिंक पाठविली जात आहे. दररोज सुमारे वीस हजार नागरिकांना बल्क एसएमएस पाठवले जात आहेत. दोन दिवसांपासून अशाप्रकारे बल्क एसएमएस पाठविण्यास सुरुवात झाली आहे.नव्या आर्थिक वर्षात महापालिकेने घोषित केल्यानुसार आॅनलाइन घरपट्टी भरल्यास महापालिकेच्या बिलाची वाट न बघता स्वत: पुढाकार घेऊन पट्टी भरल्याबद्दल पाच टक्के, आॅनलाइन घरपट्टी भरल्यास अधिक एक टक्का अशी सवलत दिली जाते. तर सोलरवॉटर घरी असेल आणि त्याची अधिकृत नोंद महापालिकडे केली असेल तर पाच टक्के सवलत दिली जाते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकरonlineऑनलाइन