लासलगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा नावलौकिक वाढविण्यास संचालक मंडळ कटिबद्ध असून, शेतकरीवर्गाच्या शेतमालाला भाव मिळावा याकरिता शासनदरबारी सतत प्रयत्न केले जातील तसेच बाजार समितीच्या कामकाजात कोणत्याही घटकांच्या मागण्यांसाठी चर्चेतून समन्वय साधून लिलाव राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन सभापती जयदत्त होळकर यांनी केले.लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी सभापती जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती सुभाष कराड, सदस्य पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, अशोक गवळी, ललित दरेकर, रमेश पालवे, सचिनकुमार ब्रह्मेचा, सौ. प्रीती नवनाथ बोरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. भाऊसाहेब गांगुर्डे यांनी माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करावी, अशी मागणी केली. नितीन जैन यांनी आडत व खरेदीदार यांना एकच नावाने अनुज्ञप्ती देण्यात यावी व कांदा भाववाढीसाठी प्रक्रियाउद्योग सुरू करावे, अशी मागणी केली. प्रमोद पवार यांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असता पाणी टाकी दिल्याबद्दल व जलसंधारण कामे केल्याबद्दल धन्यवाद दिले. याप्रसंगी शिवनाथ जाधव, सचिन होळकर, संतोष ब्रह्मेचा, संतोष राजोळे, विशाल पालवे, राजेंद्र चाफेकर, उन्मेष डुंबरे यांच्यासह कार्यक्षेत्रातील सरपंच सेवा संस्थेचे प्रतिनिधी व सुदीन टर्ले, नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत, सुशील वाढवणे, सुनील डचके, सुरेश विखे, डी.पी होळकर, अशोक गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
कामकाजात समन्वय साधणार
By admin | Updated: October 22, 2016 23:29 IST