शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
2
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
3
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
4
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
5
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
6
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
7
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
8
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
9
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
10
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
11
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
12
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
13
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
14
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
15
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
16
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
17
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
18
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
19
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

सहकारी बॅँकांची सुरक्षितता वाऱ्यावर

By admin | Updated: June 14, 2016 23:59 IST

निष्काळजीपणा : कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नामको बॅँकेच्या पाटीलनगर शाखेत दरोड्याचा प्रयत्न शाखा व्यवस्थापकाच्या धाडसीवृत्तीमुळे हाणून पाडला गेला असला तरी शहरातील प्रामुख्याने अनेक सहकारी बॅँका व पतसंस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही सहकारी बॅँका व पतसंस्थांमध्ये सुरक्षारक्षकच नसल्याने कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका निर्माण झालेला आहे. व्यवस्थापन व संचालक मंडळांच्या निष्काळजीपणामुळे बॅँकांची सुरक्षितता ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येते.दोन दिवसांपूर्वी त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर येथील नामको बॅँकेच्या शाखेत बुरखाधारी दरोडेखोरांकडून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला होता. बॅँकेच्या शाखाधिकाऱ्याने धाडस दाखवत दरोडेखोरांना अटकाव केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला होता. मिळालेल्या माहितीनुसार सदर शाखेत दोनच कर्मचारी कार्यरत असून, तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक केलेली नाही. सदर शाखेत उलाढाल कमी होत असल्याने दोनच कर्मचारी नियुक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक बॅँकांमध्ये किमान चार ते सहा कर्मचारी नियुक्त करणे अपेक्षित असते. नामको बॅँकेप्रमाणेच शहरातील अन्य काही सहकारी बॅँका व पतसंस्थांच्या शाखांमध्येही सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका नाहीत. एटीएम केंद्राच्या ठिकाणीही सुरक्षा रक्षक आवश्यक असताना त्यांचीही सुरक्षा रामभरोसे सोडून दिली जाते. पोलीस आयुक्तालयाने यापूर्वीच शहरातील बॅँकांच्या संचालक व प्रशासकांची बैठक घेऊन सुरक्षिततेसंबंधी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्यानेच दरोड्याच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याची भावना कर्मचारीवर्गात आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. उलाढाल कमी होते म्हणून बॅँक शाखेत अपुरा कर्मचारीवर्ग नियुक्त करणे चुकीचे असल्याचीही चर्चा असून, बॅँक व्यवस्थापन व संचालक मंडळाच्या निष्काळजीपणामुळेच बॅँकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)