नाशिक : शहरात आठवडाभरापासून गारठा वाढला आहे. रविवारी पहाटेपासूनच थंड वाऱ्यांचा वेग अधिकच वाढल्याने नाशिककर चांगलेच गारठले. किमान तापमानाचा पारा रविवारी (दि.५) १०.६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली. पहाटेपासून वेगाने वाहणारे थंड वारे दुपारपर्यंत ‘जैसे थे’ वाहत असल्यामुळे दिवसभर नागरिकांना थंडीची तीव्रता जाणवली. या पाच दिवसांमध्ये दुसºयांदा तापमान १० अंशापर्यंत घसरले.नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली. या हंगामातील नीचांकी १०.३ अंशापर्यंत पारा घसरला. यामुळे नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले. पहाटेपासून नाशिककरांना हुडहुडी भरली होती. तसेच दिवसभर नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करण्यास पसंती दिली. बुधवारी तापमानाचा पारा ११.६ अंशांपर्यंत मोजला गेला. गेल्या आठवडाभरापासून वातावरणात गारठा वाढल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावालागत आहे. शुक्रवारी किमान तापमान ११.२ अंश इतके होते. डिसेंबरअखेर १३ अंशांपर्यंत किमान तापमानाचा पारा स्थिरावत होता, मात्र नवीन वर्ष उजाडताच पारा थेट १० अंशापर्यंत खाली घसरला. याबरोबरच कमाल तापमानदेखील २८ अंशांवरून शुक्रवारी थेट २६ अंशांपर्यंत खाली आले. यामुळे नाशिककरांना सध्या दिवसाही वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला आहे.मागील बुधवारी या हंगामातील नीचांकी किमान तापमान १०.३ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यादिवशी कमाल तापमान २७.८ अंश होते, मात्र रविवारी किमान तापमानाचा पारा १०.६ अंशापर्यंत खाली घसरला तसेच कमाल तापमानदेखील थेट २४.३ अंशांपर्यंत घसरले. यामुळे दिवसभर नाशिककरांना वातावरणात गारवा जाणवत होता. थंड वाºयाचा वेग दिवसभर टिकून असल्यामुळे शनिवारपासून कमाल तापमानात घसरण सुरू झाली आहे.
थंड हवेचा वेग वाढल्याने शहर गारठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:47 IST
आठवडाभरापासून गारठा वाढला आहे. रविवारी पहाटेपासूनच थंड वाऱ्यांचा वेग अधिकच वाढल्याने नाशिककर चांगलेच गारठले. किमान तापमानाचा पारा रविवारी (दि.५) १०.६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली. पहाटेपासून वेगाने वाहणारे थंड वारे दुपारपर्यंत ‘जैसे थे’ वाहत असल्यामुळे दिवसभर नागरिकांना थंडीची तीव्रता जाणवली. या पाच दिवसांमध्ये दुसºयांदा तापमान १० अंशापर्यंत घसरले.
थंड हवेचा वेग वाढल्याने शहर गारठले
ठळक मुद्देहुडहुडी : किमान तापमान १०.६, तर कमाल तापमान २४ अंशांपर्यंत घसरले