शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अकादमीत आज १२०व्या सत्राचा दीक्षान्त सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 01:54 IST

महाराष्ट्र पाेलीस अकादमीतील १२०व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शनिवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला आहे. पोलीस अकादमीत २४ जून २०२१ पासून सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रातील ३९४ उमेदवारांमध्ये २७८ पुरुष व ११६ महिला असे ३९४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश असून या दीक्षान्त सोहळ्यानंतर हे सर्व पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या सेवेत दाखल होणार आहेत.

नाशिक : महाराष्ट्र पाेलीस अकादमीतील १२०व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शनिवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला आहे. पोलीस अकादमीत २४ जून २०२१ पासून सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रातील ३९४ उमेदवारांमध्ये २७८ पुरुष व ११६ महिला असे ३९४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश असून या दीक्षान्त सोहळ्यानंतर हे सर्व पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्र्यंबकराेडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कवायत मैदानावर सकाळी ८ वाजता दीक्षान्त सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार उपस्थित राहणार आहे. प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची संचलनानंतर पारितोषिक वितरण होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षान्त सोहळा होणार होता. मात्र, सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पूर्वनियोजन संपूर्णपणे कोलमडले असून, केवळ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीक्षान्त सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार