शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण :देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:51 IST

वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

ठळक मुद्दे बस्तीराम सारडा व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.बस्तीरामजी सारडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे परशुराम साइखेडक र नाट्यगृहात बस्तीराम सारडा यांच्या ५५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ‘संतांना अपेक्षित सामाजिक समता समाज का स्वीकारत नाही?’ विषयायावर तीनदिवसीय व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफतांना ते गुरुवारी (दि.१०) बोलत होते. व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.८) पहिले पुष्प गुुंफतांना त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीच संतांचे अवतरण झाले व त्यांना वाङ्मय निर्मिती करावी लागली. त्यातून त्यांनी मानवी कल्याणाचाच मार्ग प्रशस्त केल्याचे सांगितले, तर बुधवारी (दि.९) तृतीय व अंतिम पुष्प गुंफताना संत समजून घ्यायचे असतील तर सर्वप्रथम त्यांच्या वैचारिकतेला, उद्गाराला, उपदेशाला असलेला सामाजिक अधिष्ठानाचा आवाका समजून घेण्याचे आवाहन केले.व्याख्यानमालेचा समारोप कराताना देगलूरकर महाराज म्हणाले, विश्वातील विविधता व विषमता कधीच संपू शकत नाही. तसे संतांनाही अपेक्षित नाही. त्यामुळेच संतांनी वेगवेगळ्या घटकांची समानतेचा धागा पकडून समाजाला समानतेचा संदेश दिला, जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवताना त्याचा आत्मा हा समानतेचा केंद्र मानले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम